नांदगाव : शासकीय योजना लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत ही शासनाची भूमिका असून, आता लोकांनी शासकीय कार्यालयात वेळ न घालवता शासकीय अधिकारी लोकांमध्ये जात आहेत. वेळ, श्रम व पैसा वाचावा आणि लोकांना तत्काळ सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कटिबद्ध असून, मुलांच्या पालकांनी आता सजगता बाळगली पाहिजे. विविध दाखले आता शाळेतच वाटप होत असून, तहसील कचेरीवर खेपा कमी होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मागितलेली कागदपत्रे पालकांनी त्वरित द्यावीत, असे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले.नूतन विद्यालय, यशवंतनगर, नांदगाव येथे शुक्रवारी विद्यार्थ्यांना उपयुक्त असे जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले व अधिवास दाखल्याचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चेअरमन फैरोज घलटे, मुख्याध्यापक गिरीश जोशी, नांदगाव सरपंच मुअज्जम इसवारे, उपसरपंच जितेंद्र दिवेकर, लहू रावजी, अस्लम इलडे, भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, मंडळ अधिकारी जयेश ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक विभागाच्या लोकांनी विविध खात्यांची माहिती देऊन ज्ञान अवगत केले. नांदगाव सरपंच मुअज्जम इसवारे यांनी विशेष ऋण व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय खोत तर आभार सागर राऊत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमासाठी असंख्य नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
विविध सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध
By admin | Updated: March 5, 2016 02:09 IST