शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

अयोध्येत नक्की जा म्हणजे तुमचे हिंदुत्वाचे खरे रक्त जागे होईल, देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2020 17:30 IST

शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटी मागणी करण्यात येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला.

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये भाजपाचे राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक भाजपाचे नेते उपस्थित आहेत. यावेळी भाजपाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

शहरी नक्षलवादाचे सत्य बाहेर येईल म्हणून एसआयटी मागणी करण्यात येत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केला. याशिवाय, सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना कशी बसते? अशा सवाल करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अयोध्येमध्ये भव्य राम मंदिराचे निर्माण होणार आहे. यावरुन आता काहीजण अयोध्येला जाण्याची भाषा करत आहे. मात्र, त्यांनी अयोध्येला नक्की जावे. कारण, त्यांचे खरे हिंदुत्वाचे रक्त जागे होईल, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. 

दरम्यान, नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आज शक्तिप्रदर्शन करण्यात आले. पहिल्यांदाच नवी मुंबईमध्ये राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून भाजपाच्या प्रमुख नेत्यांसह जवळपास अनेक पदाधिकारी उपस्थित असल्याचे समजते. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक  स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला असून, या अधिवेशनामुळे पक्षाला लागणारी गळती थांबणार का? याकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

- चंद्रकांत दादा कालही विनिंग टीमचे कॅप्टन होते आणि आजही आहेत.- महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्वबळावर भाजपाचे सरकार आणणार- भाजपा ही हरलेली टीम नाही तर जिंकेलली टीम आहे- भाजपात पद म्हणजे जबाबदारी, मिरवण्यासाठी नाही - भाजपात कोणतीही गोष्ट वारसात मिळत नाही - भाजपा सामान्य जनतेचा विचार करणारा पक्ष - भाजपात देशात आणि राज्यात मोठ्या नेत्यांची परंपरा - अयोध्या आणि राम मंदिरावरून देवेंद्र फडणवीसांचा शिवसेना टोला- अयोध्येत नक्की जा, म्हणजे तुमचं रक्त जागे होईल.- बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला हिंदुत्वाचा विचार देशाला दिला- अयोध्येतील राम मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी बलिदान दिले आहे.- 370 कलम हटविल्यामुळे काश्मीरमध्ये रक्ताचे पाट नाही, तर नवी पहाट उगवली 

- गेल्या 70 वर्षांपासून प्रलंबित 370 चा प्रश्न पंतप्रधान मोदी सरकारने मार्गी लावला- काही लोक जाणून बुजून एनआरसी आणि सीएए कायद्याबाबत संभ्रम पसरवला जात आहे- काश्मीरमध्ये रक्ताचे पाट, नाही तर नवी पहाट उगवली- सीएए कायद्याची मागणी नेहरू, शास्त्रींनी केली होती - मोदी सरकारच्या काळात राम मंदिराची निर्मिती झाली - सत्तेसाठी काही मोठे नेते खोटे बोलत आहेत - सीएए मागासवर्गीय, आदिवासी विरोधी असल्याचे सिद्ध करा, शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांचे आव्हान- भाजपाचे ऐकून घेण्याचे दिवस संपले - आता बचावात्मक धोरण नको, आक्रमक बना- भाजपाचा विश्वासघात झाला आहे- सत्तेसाठी काही पक्ष जल-दल बिना तडफडत आहेत - काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन सत्ता स्थापन करण्याचे वचन दिलं होत का? उद्धव ठाकरेंना सवाल- भाजपाचे लढण्याचे दिवस आहेत. - ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला- आम्ही तिघे असलो तरी तिघांचा सामना करू- प्रकल्पांची नावे बदला, पण जनहितांचे काम- पुन्हा जनतेच्या कोर्टात जाण्याची हिम्मत दाखवा- सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत शिवसेना कशी बसते?- धुळे जिल्हा परिषदमध्ये आपण तिन्ही पक्षांना हरविले. आता महापालिका निवडणूक येत आहे.- नवी मुंबईपासून आता नवी सुरुवात होणार आहे. आपल्या विजयाची सुरुवात याच नव्या मुंबईपसून करणार आहोत. नवी मुंबई आणि औरंगाबाद मध्ये महापौर भाजपाचा असेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा