शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

नवी मुंबईत पुन्हा मुलीच अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 02:47 IST

दहावीचा निकाल जाहीर । शहराचा निकाल ८४ टक्के । २० शाळांचा निकाल १00 टक्के

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल ८ मे रोजी जाहीर झाला.नवी मुंबई शहरात मुलांच्या तुलनेत मुलींचे पास होण्याचे प्रमाण अधिक असून, मुलींनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी नवी मुंबई शहराचा निकाल दरवर्षीपेक्षा कमी म्हणजेच ८४.५४ टक्के लागला असून, शहरातील सुमारे २० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मंडळामार्फत गेल्या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम आणि प्रश्निपत्रिकेचे स्वरूपदेखील बदलण्यात आले होते. याचा परिणाम राज्यासह नवी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या निकालावर झाला आहे.100टक्के निकाललागलेल्या शाळासेंट मेरी स्कूल वाशी, फादर अग्नल मल्टिपर्पज स्कूल वाशी, सेक्रे ट हार्ट स्कूल वाशी, सेंट झेवियर्स स्कूल नेरुळ, नूतन मराठी विद्यालय नेरु ळ, एस. एस. हायस्कूल शिरवणे, विद्याभवन स्कूल नेरु ळ, न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल ऐरोली, एस. बी.ओ. ए. स्कूल नेरु ळ, टिलक इंटरनॅशनल स्कूल घणसोली, महिमा इंटरनॅशनल स्कूल कोपरखैरणे, एस. आर. मेघे विद्यालय ऐरोली, जी. जी. एज्युकेशन अ‍ॅकॅडमी नेरु ळ, शारदा विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल, विश्वभारती स्कूल मराठी माध्यम नवी मुंबई, डी. ए. व्ही. पब्लिक स्कूल नेरु ळनोंदणीकृत विद्यार्थीविद्यार्थी विद्यार्थिनी८३८८ ७४०६परीक्षार्थी विद्यार्थीविद्यार्थी विद्यार्थिनी८३४१ ७३७४पास विद्यार्थीविद्यार्थी विद्यार्थिनी६४०१ ६४०७पनवेलचा ८२ टक्के निकालपनवेल : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. पनवेल तालुक्याचा निकाल ८२.४५ टक्के लागला आहे. तालुक्यातील एकूण १०७२३ विद्यार्थ्यांची दहावीला नोंदणी झाली होती. त्यापैकी १०६६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी ८७९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी तालुक्याचा दहावीचा निकाल ढासळला आहे. १२० शाळांपैकी केवळ दहा शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये महात्मा एज्युकेशन सोसायटी, खांदा कॉलनी बार्न्स हायस्कूल पनवेल, कारमेल हायस्कूल कळंबोली, हार्मोनी पब्लिक स्कूल खारघर, सेंट टीएवोई स्कूल नवीन पनवेल, एमव्हीएम हायस्कूल कामोठे, बार्न्स हिंदी माध्यमिक स्कूल पनवेल, हुद्दार इंग्लिश स्कूल कोलाखे, रामकृष्ण अ‍ॅकॅडमी हरिग्राम, सेंट जॉर्ज स्कूलचा समावेश आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई