शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घोट नदी पुन्हा काळवंडली; संतप्त ग्रामस्थांची पोलीस ठाण्यात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 18:12 IST

तळोजा वसाहतीमधील प्रदूषण ही नित्याचीच बाब आहे. गणेशोत्सवात घोट नदीमधील प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांना गणेश विसर्जन देखील करता आले नव्हते आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती उदभवली असून घोट नदीला प्रदूषणामुळे या नदीला अक्षरशः गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पनवेल : तळोजा वसाहतीमधील प्रदूषण ही नित्याचीच बाब आहे. गणेशोत्सवात घोट नदीमधील प्रदूषणामुळे येथील ग्रामस्थांना गणेश विसर्जन देखील करता आले नव्हते आता पुन्हा एकदा हीच परिस्थिती उदभवली असून घोट नदीला प्रदूषणामुळे या नदीला अक्षरशः गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.केमिकलयुक्त पाणी या नदीच्या पाण्यात मिसळल्याने उग्र वासामुळे या परिसरात फिरणे देखील अवघड झाले आहे. वारंवार अशा प्रकारचे प्रकार सर्रास घडत असल्याने ग्रामस्थांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. हाजीमलंग येथून उगमस्थान असलेली ही नदी घोट गाव, तळोजा मजकूर, पेठाळी मार्गी तळोजा खाडीत जाऊन मिळते. येथील स्थानिक रहिवासी तळोजा मजकूर या ठिकाणी या नदीपात्रात विधिवत दशक्रिया विधी देखील अनेक वर्षांपासून करीत आले आहेत. स्थानिकांच्या दृष्टीने पवित्र मानल्या जाणारी ही नदी आज प्रदूषणाच्या कचाट्यात सापडली आहे.रविवारी सुट्टीच्या दिवशी अचानकपूर्ण नदी काळवंडल्याचे येथील रहिवाशांच्या निदर्शनास आले. ही परिस्थिती पूर्ववत होईल, असा भावनेने येथील रहिवाशांनी याकडे दुर्लक्ष केल्यानंतर सोमवारी परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे ग्रामस्थ व रहिवाशांच्या निदर्शन आल्यानंतर ग्रामस्थांनी स्थानिक नगरसेवकाच्या सोबत तळोजा पोलीस ठाणे या घटनेची दोषींवर कारवाईची मागणी केली. एम ब्लॉक परिसरात येणा-या रसायनमिश्रित वाहिनी फुटल्याने संबंधित प्रकार झाल्याची माहिती सूत्रामार्फत मिळाली आहे. या घटनेची दखल घेऊन येथील ग्रामस्थांनी तळोजा पोलीस ठाणे गाठत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांची भेट घेतली. संबंधित घटनेतील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.उग्र वासामुळे मॉर्निंग वॉक बंदया नदीच्या मात्राजवळ तळोजा वसाहतीची निर्मिती करण्यात आली आहे. येथील रहिवासी संख्या देखील झपाट्याने वाढली आहे. अनेक रहिवासी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असतात. मात्र दोन दिवसांपासून या ठिकाणी नदी प्रदूषणामुळे उग्र वास सुटल्याने अनेक रहिवासी दोन दिवसांपासून मॉर्निंग वॉकला गेले नसल्याचा खुलासा स्थानिक नगरसेवक हरेश केणी यांनी यावेळी केला.