शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

घणसोलीतील प्रकार : अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:50 IST

घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली आहे. या वेळी एक विदेशी महिला पॅराशूटमधून उतरल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - घणसोली परिसरात अज्ञात पॅराशूटमुळे खळबळ उडाली आहे. दहशतवाद विरोधी पथकाकडून संपूर्ण परिसराची झाडाझडती घेण्यात आली आहे. या वेळी एक विदेशी महिला पॅराशूटमधून उतरल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले आहे.घणसोली सेक्टर १५ येथील पामबीच मार्गालतच्या परिसरात शनिवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. येथे पॅराशूट उडत असल्याचे काहींच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र, पोलिसांना काहीच आढळून न आल्याने रविवारी दहशतवाद विरोधी पथकाने परिसराची पाहणी केली. या वेळी स्कायलार्क इमारतीमधील १९व्या मजल्यावरील रहिवासी शोभा रावल यांनी घराच्या खिडकीजवळून पॅराशूट जाताना पाहिल्याचे सांगितले, त्यामुळे रविवारी परिसराची व इमारतींच्या छतांची झाडाझडती घेण्यात आली. खाडीलगतच्या मोकळ्या जागेत पॅराशूटद्वारे उतरताना विदेशी महिलेला पाहिल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, ही विदेशी महिला कोण? तिने पॅराशूटचे उड्डाण कुठून केले? हे समजू शकलेले नाही.घणसोलीत अज्ञात पॅराशूट उडाल्याची तक्रार आली आहे. विदेशी महिला व पुरुषाला पॅराशूटसोबत पाहिल्याचे काहींचे म्हणणे आहे. प्रशिक्षित व्यक्तीकडूनही हौसेखातर हे पॅराशूट वापरलेगेल्याची शक्यता असून, अधिक तपास सुरू आहे. - तुषार दोशी,पोलीस उपआयुक्त, गुन्हे शाखाज्या ठिकाणी हे पॅराशूट उडताना पाहिले गेले, त्या ठिकाणी १५ ते २५ मजल्यांच्या इमारती आहेत. त्यापैकी एखाद्या इमारतीवरून पॅराशूट घेऊन उडी मारल्याचीही शक्यता आहे. पाहणी दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या श्री समर्थ हाइट या २३ मजली इमारतीच्या छतावर कामगारांव्यतिरिक्त अज्ञात व्यक्तीच्या बुटाचे ठसे आढळून आले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई