शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकघरातील कांद्यासह लसणाची फोडणी महागली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2021 08:19 IST

​​​​​​​मुंबईमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान मधून लसूणची आवक होत असते. सद्यस्थितीमध्ये प्रति दिन सरासरी १०० टन आवक होत आहे. मागील काही दिवसांपासून लसूणची किंमत वाढू लागली आहे.

नवी मुंबई : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कांदा व लसूणचे दर वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये कांदा १६ ते २३ रुपयांना विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हेच दर ३० रुपयांवर गेले आहेत. होलसेल मार्केटमध्ये लसूण ६० ते १४० रुपयांना विकला जात असून, किरकोळ मार्केटमध्ये हे दर १६० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान मधून लसूणची आवक होत असते. सद्यस्थितीमध्ये प्रति दिन सरासरी १०० टन आवक होत आहे. मागील काही दिवसांपासून लसूणची किंमत वाढू लागली आहे. मे मध्ये होलसेल मार्केटमध्ये ४० ते १०० रुपये किलो दराने लसूण विकला जात होता. सद्यस्थितीमध्ये हेच दर ६० ते १४० झाले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये हेच दर १६० ते २०० रुपयांवर पोहोचले आहेत. कांद्याचे दरही वाढू लागले आहेत. मे महिन्यात एपीएमसीमध्ये १० ते १५ रुपये किलो दराने कांदा विकला जात होता. सद्यस्थितीमध्ये हेच दर १६ ते २३ रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये कांदा ३० रुपये किलो दराने विकला जात आहे. पुणे व नाशिक परिसरातून कांद्याची आवक होत आहे. माल खराब होण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे कांदा दरात वाढ होत असल्याची माहिती मुंबई बाजार समितीचे संचालक अशोक वाळुंज यांनी दिली.