शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

स्मारकाजवळील उद्यानाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 23:30 IST

राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे.

नवी मुंबई : पाचाड येथील राजमाता जिजाऊंच्या स्मारकाजवळील उद्यानाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. उद्यानामध्ये गवत वाढले असून, मुलांसाठी असलेली खेळणीही तुटलेली असल्यामुळे स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

राज्य शासनाने रायगड किल्ला संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली आहे. रायगड किल्ला, पाचाडचा राजमाता जिजाऊंचा वाडा व इतर कामे केली जाणार आहेत. प्रत्यक्ष कामांना सुरुवात झाली असली तरी सर्व कामे पूर्ण होण्यास खूप कालावधी लागणार आहे. सद्यस्थितीमध्ये पाचाड येथील राजमाता जिजाऊ स्मारकाची देखभाल पुरातत्त्व विभागाकडून केली जात आहे. या ठिकाणी एक कर्मचाºयाची नियुक्तीही केली आहे. समाधीच्या आवारामध्ये दिवसभर नियमित साफसफाई केली जाते. दिवाबत्तीही वेळेवर केली जात आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून समाधीस्थळापर्यंत साफसफाई केली जाते; पण समाधीच्या बाजूला उभारण्यात आलेल्या उद्यानाची योग्य देखभाल केली जात नाही. उद्यानामध्ये प्रचंड गवत वाढले आहे. बैठक व्यवस्थेसाठीच्या शेडचीही दुरवस्था झाली आहे.

लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यानामध्ये खेळणी बसविण्यात आली आहेत. समाधीस्थळ पाहण्यासाठी राज्य व देशाच्या कानाकोपºयामधून नागरिक येत असतात. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही मोठी असते. या सर्वांना काही क्षण विरंगुळा मिळावा, यासाठी हे उद्यान बनविण्यात आले आहे; परंतु त्याची देखभाल करण्यासाठी काहीही व्यवस्था केली जात नाही. वाढलेल्या गवतामुळे उद्यानामध्ये जाताही येत नाही. यामुळे शिवभक्त व येथे येणाºया नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.विधान परिषदेमध्ये उमटले होते पडसादराजमाता जिजाऊ स्मारक परिसराची योग्य देखभाल केली जात नसल्याचे पडसाद अनेक वेळा विधान सभा व विधान परिषदेमध्ये उमटले आहेत. मार्च २०१६ मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही या विषयावर आवाज उठवून समाधीस्थळ व परिसराची योग्य देखभाल केली जावी, अशी मागणी केली होती. शिवप्रेमी नागरीकांनी याविषयी आवाज उठविला होता. 

पाचाडमधील राजामाता जिजाऊ समाधीस्थळ हे सर्वांसाठी प्रेरणास्रोत आहे. यामुळे येथे हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. समाधीचे आवार स्वच्छ ठेवले जाते; परंतु बाजूच्या उद्यानाची दुरवस्था झाली असून त्याची योग्य ती देखभाल केली जावी.- रसिका माने, पर्यटक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई