शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाच्या धरतीवर दहावी सराव परीक्षेचा शुभारंभ, "आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा", गणेश नाईक यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

By कमलाकर कांबळे | Updated: January 6, 2024 19:02 IST

Navi Mumbai: दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सराव परीक्षेचा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ करण्यात आला.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई - दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाता यावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या सराव परीक्षेचा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निर्भय आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मागील पंचवीस वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. आतापर्यंत दीड लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या सराव परीक्षेचा लाभ घेतला आहे. नेरूळ येथे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये तिचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. संजीव नाईक, ट्रस्टचे सचिव तथा नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक तसेच विशेष अतिथी म्हणून शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नात जयश्री चौगुले, निवृत्त ज्येष्ठ वैज्ञानिक अनंत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी ८५ शाळांमधील एकूण ९९०० विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. २६ केंद्रांवर मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमधून ही परीक्षा घेतली जात असल्याची माहिती संजीव नाईक यांनी आपल्या प्रस्ताविकातून दिली. ज्येष्ठ वैज्ञानिक आनंद चौगुले यांनी जीवनामध्ये उपयोगी पडेल असे ज्ञान मिळवा आणि आपली बुद्धिमत्ता योग्य क्षेत्रामध्ये वापरा, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

तज्ज्ञ शिक्षकांमार्फत उत्तरपत्रिकांची तपासणीबोर्डाच्या धरतीवर आयोजित केलेल्या या सराव परीक्षा २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. तिच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी त्या त्या विषयांतील तज्ज्ञ शिक्षकांची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे तिचा तत्काळ निकाल जाहीर करून अव्वल ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक पारितोषिके दिली जाणार आहेत.

टॅग्स :ssc examदहावीGanesh Naikगणेश नाईकNavi Mumbaiनवी मुंबई