शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

गणेश नाईक समर्थकांनी पक्षांतर केल्यास नगरसेवकपद जाईल- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 06:40 IST

दहा नगरसेवकांनी घेतली पवारांची भेट

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू इच्छिणाऱ्या दहा नगरसेवकांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागा असे पवार यांनी सांगितले असून नाईक समर्थकांनी पक्षांतर केल्यास त्यांचे पद धोक्यात येईल असेही स्पष्ट केले.नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसमधील सर्व ५२ नगरसेवक भारतीय जनता पक्षामध्ये जाणार असल्याचे नाईक समर्थकांनी स्पष्ट केले होते. परंतु प्रत्यक्षात पक्षातील एक गटाने राष्ट्रवादीमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर शुक्रवारी चर्चा केल्यानंतर दहा नगरसेवकांनी मुंबईमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी नवी मुंबईमधील परिस्थितीचा आढावा घेवून पुन्हा पक्षबांधणी जोमाने करा अशा सुचना सर्वांना दिल्या. नवीन जिल्हा अध्यक्ष म्हणून माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्यावर धुरा सोपविण्याचे जवळपास निश्चीत केले असून ऐरोली मतदार संघातील पक्षबांधणीची जबाबदार नगरसेवक शंकर मोरे यांच्यावर सोपविली आहे. पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे एकजरी नगरसेवक पक्षात राहिला तर पक्ष बदलणाऱ्यांचे पद धोक्यात येवू शकते असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीला ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कुलकर्णी व त्यांचे समर्थक तीन नगरसेवक, अशोक गावडे, शंकर मोरे, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, सायली शिंदे, संगीता बोºहाडे व इतर पदाधिकारी उपसिथत होते. यावेळी सीबीडीमधील तीन नगरसेवक अनुपस्थित असल्याने ते पक्षात राहणार का याविषयी शंका उपस्थित होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस