शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत गणेश नाईकांना धक्का; भाजप नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2020 06:56 IST

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधले शिवबंधन

नवी मुंबई : पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला खिंडार पडले आहे. तुर्भे स्टोअर येथील सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांनी रविवारी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चार नगरसेवकांनी मातोश्री येथे शिवबंधन बांधून शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. भाजपचे नेते आमदार गणेश नाईक यांना हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.सुरेश कुलकर्णी हे आमदार गणेश नाईक यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. पालिका निवडणुकीपूर्वी ते शिवसेनेत जाणार याबाबत चर्चा रंगली होती. तुर्भे स्टोअर येथे त्यांनी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू समारंभाला जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार राजन विचारे, शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा, विठ्ठल मोरे आदी शिवसेना नेत्यांची उपस्थिती होती. यावरून कुलकर्णी यांच्या शिवसेना प्रवेशावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तब झाले होते.गेल्या आठवड्यात त्यांच्यासह चार नगरसेवकांनी आपल्या पदाचा पालिका आयुक्तांकडे राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या सेना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला होता. अखेर रविवारी त्यांनी तुर्भे परिसरातील तीन नगरसेवकांसह मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात सुरेश कुलकर्णी यांच्यासह राधा कुलकर्णी, मुद्रिका गवळी आणि संगीता वास्के यांचा समावेश आहे. याप्रसंगी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा, महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले व जिल्हाध्यक्ष विठ्ठल मोरे आदी उपस्थित होते.पक्षांतराचे नाट्य रंगणार?पुढील काही दिवसांत भाजपचे आणखी काही नगरसेवक शिवसेना, राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी शहरात पक्षांतराचे नाट्य चांगलेच रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाBJPभाजपा