शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

गणपती पावला अन् भाजीपाला स्वस्त झाला, मुंबई, नवी मुंबईकरांना दिलासा : कोथिंबिरीचे दरही आले निम्म्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 06:03 IST

vegetables: श्रावणामध्ये महागाईमुळे त्रस्त झालेल्या मुंबई, नवी मुंबईकरांना गणेशोत्सवामध्ये दिलासा मिळाला आहे. मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत.

नवी मुंबई : श्रावणामध्ये महागाईमुळे त्रस्त झालेल्या मुंबई, नवी मुंबईकरांना गणेशोत्सवामध्ये दिलासा मिळाला आहे. मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. किरकोळ मार्केटमध्येही ते प्रतिकिलो शंभरीच्या आतमध्ये आले असून कोथिंबिरीचे दरही निम्म्यावर आले आहेत. मुंबईसह नवी मुंबईमध्ये श्रावणामध्ये सर्वच भाज्यांचे दर प्रतिकिलो शंभरीच्या पुढे गेले होते. यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. भाजीपाल्याऐवजी डाळी, कडधान्याला ग्राहकांनी पसंती दिली होती. एक महिना बाजारभाव तेजीत होत. मात्र, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मागणी घटल्याने दर कमी होण्यास सुरुवात झाली आहे. श्रावणात किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १८० रुपयांवर गेले होते. 

आता ते ४० ते ८० रुपयांवर आले आहेत. कोथिंबिरीचे दर २० ते ५० रुपयांवरून १० ते २५ रुपयांवर आले आहेत. इतर भाज्यांचे दरही कमी झाले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये गुरुवारी ५७८ वाहनांमधून २६७७ टन भाजीपाला विक्रीसाठी आला असून त्यामध्ये ५ लाख ७८ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. गणेशोत्सवामुळे मागणी कमी झाली असल्यामुळे दर कमी झाल्याची माहिती बाजार समिती संचालक शंकर पिंगळे यांनी दिली. 

होलसेल व किरकोळ मार्केटमधील दरप्रकार    २२ ऑगस्ट    १ स्प्टेंबर    १ सप्टेंंबर         (एपीएमसी)    (किरकोळ)भेंडी    ३० ते ५०    २० ते ३४    ४० ते ६०दुधी भोपळा    २८ ते ४०    १६ ते २८    ५० ते ६०गवार    ४५ ते ६५    ४० ते ५०    ६० ते ८०ढोबळी मिरची    ३० ते ४०    २६ ते ३२    ६० दोडका    ४० ते ५२    ३२ ते ४४    ६० ते ८०तोंडली    ६० ते ८०    ४० ते ५०    ६०वाटाणा    ७० ते १००    ६० ते ७०    ८० ते १००

टॅग्स :vegetableभाज्याGanesh Mahotsavगणेशोत्सव