शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

करंजा बंदरातून मच्छीमारांचा आर्थिक स्तर उंचावणार - गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 03:45 IST

दीडशे कोटी खर्चाच्या अत्याधुनिक करंजा बंदराच्या उभारणीनंतर मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार आहे.

उरण : दीडशे कोटी खर्चाच्या अत्याधुनिक करंजा बंदराच्या उभारणीनंतर मत्स्यव्यवसायाला चालना मिळणार आहे. मासळी निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, येत्या काळात मच्छीमारांची आर्थिक प्रगती डॉलरमध्ये होईल. शिवाय या बंदरामुळे भविष्यात रोजगारनिर्मिती आणि पर्यटनातही वाढ होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उरणमध्ये व्यक्त केला.करंजा येथील मच्छीमार बंदराच्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमिपूजन गुरु वार, २४ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सेझ प्रकल्पामुळे सव्वा लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. जेएनपीटी सेझमध्ये निर्माण होणाºया रोजगारामध्ये ८० टक्के रोजगार कोकणातील भूमिपुत्रांना दिला जाईल, असा दावाही गडकरी यांनी केला.देशाच्या विकासाचा मार्ग सागरी मार्गावरूनच जातो, असेच देश जगावर राज्य करतात. त्यासाठी मच्छीमार समाजाचे आर्थिक उत्पन्न वाढवायचे आहे. दरवर्षी सहा हजार कोटींचे मासळीचे उत्पन्न १० हजार कोटींंपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. रायगड, कोकणातील अनेक बंदरे विकसित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय मुंबई, रायगड, कोकणात विविध ठिकाणी रो-रो सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. मच्छीमारांसाठी इंटरग्रीटेड फिशिंग हबची सुरु वात करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत मासळी निर्यातीसाठी सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, त्यामुळे भविष्यात मच्छीमारांना मासळी व्यवसायात अधिक संधी निर्माण होऊ शकतील, असेही फडणवीस म्हणाले. करंजा मच्छीमार संंस्थेचे माजी अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी प्रास्ताविक केले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी