ट्रॅव्हल्समधील मालवाहतूक ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 01:09 AM2020-11-24T01:09:24+5:302020-11-24T01:09:59+5:30

नियमांना बगल

Freight in travels is fatal | ट्रॅव्हल्समधील मालवाहतूक ठरतेय जीवघेणी

ट्रॅव्हल्समधील मालवाहतूक ठरतेय जीवघेणी

Next

नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून अवैधरीत्या होत असलेल्या मालवाहतुकीमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. यानंतरही उघडपणे ट्रॅव्हल्समधून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होत आहे. अशा ट्रॅव्हल्सवरील कारवाईकडे आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

राज्याच्या अनेक भागांतील प्रवाशांसाठी चालविल्या जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे जाळे मुंबईसह ठाणे व नवी मुंबईला जोडले गेलेले आहे. त्यानुसार नवी मुंबईतून दररोज शेकडो ट्रॅव्हल्स ये-जा करतात. लॉकडाऊनमध्ये ट्रॅव्हल्सला लागलेला ब्रेक आता अनलॉकमध्ये हटला आहे. परंतु प्रवासी वाहतुकीला परवानगी असताना बहुतांश ट्रॅव्हल्स कुरियरच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात आहेत. ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत होणारा खर्च टाळण्यासाठी स्वस्तात ट्रॅव्हल्समधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत मालवाहतूक करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्समधून मालवाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. परिणामी, प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे. अशाच प्रकरणातून शनिवारी ३५ प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. आकांक्षा ट्रॅव्हल्सची बस मुंबईकडे येत असताना सानपाडा येथे बसला आग लागली. बसमधील कुरियरचे साहित्य उतरविले जात असताना ही दुर्घटना घडली. घटनेवेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते, त्यापैकी एकाला दुखापत झाली आहे. तर बस थांबलेली असल्याने प्रवाशांनी तत्काळ बाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले.
बसला लागलेली आग विझविताना बसच्या डिक्कीत औषधे व इतर सामान असल्याचे आढळून आले. त्यात सॅनिटायझरचादेखील साठा होता असे समजते. त्यामुळेच क्षणांत संपूर्ण बस जळून खाक झाली. 

Web Title: Freight in travels is fatal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.