शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

वेळेत कर भरल्यास मोफत रवा, साखर, मैदा, गूळ, चणाडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 00:12 IST

शिवकर ग्रामपंचायतीकडून होळीनिमित्त अनोखी भेट

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : घरपट्टी व पाणीपट्टीचा कर १५ मार्चपर्यंत भरणा केल्यास शिवकर ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना मोफत रवा, साखर, मैदा, गूळ, चणाडाळ भेट दिली जाणार आहे. शिवकर ग्रामपंचायत ही जिल्ह्यातील आदर्श ग्रामपंचायत असून नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी ग्रामपंचायत म्हणून शिवकर ग्रामपंचायतीची ओळख आहे.

सरपंच अनिल ढवळे यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकीच हा एक उपक्रम आहे. थकबाकीसहित वेळेत कर  भरणाऱ्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतीकडून होळीनिमित्त विशेष भेट देण्याची योजना तालुक्यातील आदर्श शिवकर ग्रामपंचायतीकडून राबवली जात  आहे.  सरपंच अनिल ढवळे यांनी घोषणा केली असून कर भरणाऱ्या नागरिकांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून २ किलो रवा, २ किलो साखर, २ किलो मैदा, २ किलो गूळ तसेच २ किलो चणाडाळीचे पॅकेज ग्रामपंचायत उपलब्ध करून देणार आहे. तालुक्यातील शिवकर या ग्रामपंचायतीची लोकसंख्या  साडेतीन हजार आहे. रायगड जिल्ह्यातून प्रथम पुरस्कार मिळवणाऱ्या या ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या विकासाकरिता विविध उपक्रम राबवले जातात.  गावाच्या विकासाकरिता महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या घरपट्टी तसेच पाणीपट्टी स्वरूपात जमा होणाऱ्या रकमेची वेळेत वसुली करून गावाच्या विकासात भर पडावी, यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे प्रयत्न करत आहेत.

ग्रामपंचायतीतर्फे ६० हजारांची पाणीपट्टीशिवकर ग्रामपंचायत हद्दीत ४२१  नळजोडण्या असून या ठिकाणी नवी मुंबई पालिकेच्या जलवाहिनीमार्फत पाणीपुरवठा केला  जातो.  नवी मुंबई पालिकेला ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठ्यापोटी दरमहिना ६० हजार इतकी पाणीपट्टी भरावी लागते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई