शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या बहाण्याने तीन हजार नागरिकांची फसवणूक, साडेसात कोटीला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 04:19 IST

साडेसात कोटीला गंडा : प्रत्येकी ३० हजार अनामत रक्कम

नवी मुंबई : महापे-रबाळे एमआयडीसीमधील ज्ञानेश्वर फायनान्स कंपनीने कर्ज देण्याच्या बहाण्याने तीन हजारपेक्षा जास्त नागरिकांची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. साडेसात कोटी रुपयांना गंडा घातल्याचा ठपका ठेवून कंपनीचा मालक अनिकेत इंदलकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

येथील बच्चा हाउसमध्ये अनिकेत इंदलकर याने ज्ञानेश्वर फायनान्स ही कंपनी सुरू केली होती, त्याने तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कमी व्याजदराने व विनातारण कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते, यासाठी सुरक्षा अनामत रक्कम म्हणून नागरिकांकडून ३० हजार व त्यापेक्षा जास्त रक्कम गोळा केली होती. साखळी पद्धतीने कंपनीचे काम सुरू होते. सभासदांच्या मार्फत जास्त सभासद करण्यास सुरुवात केली होती. घाटकोपर येथे राहणारे चिंतामण गांगुर्डे यांनीही आॅक्टोबर २०१८ मध्ये या कंपनीमध्ये सुरक्षा अनामत रक्कम भरली होती. कंपनी संचालकांनी सुरक्षा अनामत रक्कम स्वीकारून फसवणूक केली असल्याची तक्रार रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ सहकलम ३, ४ व ५, पुरस्कार चिठ्ठी आणि पैशांचा खप योजना बंदी अधिनियम १९७८ अन्वये व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित साबळे करत आहेत.च्तीन हजारांपेक्षा जास्त नागरिकांना कमी व्याजदराने व विनातारण कर्ज देण्याचे आमिष दाखविले होते. साखळी पद्धतीने कंपनीचे काम सुरू होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे