शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक, ओळखीतून गुंतवलेले पैसे केले हडप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 23:18 IST

ओळखीच्या बहाण्याने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे.

नवी मुंबई : ओळखीच्या बहाण्याने पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून निवृत्त न्यायाधीशांची फसवणूक झाल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी ऐरोलीत राहणाऱ्या निवृत्त न्यायाधीशांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.ऐरोली सेक्टर ७ येथे राहणारे निवृत्त न्यायाधीश बी. एल. वाघमारे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. नांदेड येथून सेवानिवृत्त झाल्यानंतर मागील काही वर्षांपासून ऐरोलीत सहकुटुंब स्थायिक आहेत. या दरम्यान ते नियमित सकाळ, संध्याकाळ परिसरात फेरफटका मारण्यासाठी जात असत, त्याच वेळी दोन व्यक्ती व एका महिलेने त्यांच्यासोबत ओळख वाढवली. यानंतर ते तिघेही त्यांना सातत्याने फोन करून निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाच्या गुंतवणुकीबाबत विचारत. तसेच त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास पाच वर्षांत दुप्पट रक्कम देऊ, असे आमिषही दाखवायचे.अखेर वाघमारे यांनी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली. याचा पुरावा म्हणून त्यांना एक-एक लाखाची दोन प्रमाणपत्रे देण्यात आली होती. काही महिन्यांतच तिघांनीही संपर्क कमी केल्याने वाघमारे यांनी चौकशी केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली.>पोलिसांकडून चालढकल होत असल्याचा आरोपवाघमारे यांनी खातरजमा केली असता, गुंतवणुकीची प्रमाणपत्रे बनावट असून आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता, संबंधितांकडून त्यांना धमक्या देण्यात आल्याने त्यांनी रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार केली. बाळासाहेब जगताप, प्रज्ञा जगताप व बिजाम या तिघांविरोधात वाघमारे यांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, पोलिसांकडून कारवाईत चालढकल होत असल्याचा आरोप निवृत्त न्यायाधीश बी. एल. वाघमारे यांनी केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी