शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

दाेन काेटींचे ३ काेटी रुपये करून देताे; पनवेलमध्ये आमिष दाखवून फसवणूक; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 12:31 IST

नवीन पनवेल : दोन कोटी रुपयांचे तीन कोटी रुपये करून देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार पनवेल येथे उघडकीस ...

नवीन पनवेल : दोन कोटी रुपयांचे तीन कोटी रुपये करून देतो, असे सांगून फसवणूक केल्याचा प्रकार पनवेल येथे उघडकीस आला आहे. मयूर पांडुरंग गवळी यांनी याप्रकरणी दहा ते अकरा जणांविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मयूर गवळी यांचा पिंपरी-चिंचवड येथे अंडी विकण्याचा व्यवसाय आहे. त्यांना त्यांचा मित्र प्रशांत मोरे याने सुरतला राहणारे राजूभाई व आश्रफ यांनी गुजरात राज्यात निवडणुकीकरता जुन्या चलनी नोटांची गरज असल्याचे सांगितले. व त्या बदल्यात ते नवीन नोटा देत असल्याचे सांगितले. त्याने स्वतःकडील वीस लाख दिले असता त्याला ३० लाख मिळाले. त्यामुळे मयूर यांना राजूभाई व आश्रफ यांचा जवळचा व्यक्ती सुरेश कदम यांची भेट घालून दिली. आठ दिवसांनी मयूर, प्रशांत, सुरेश कदम व अक्षय कदम हे पिंपरी-चिंचवड येथे भेटले. यावेळी प्रशांत व सुरेश यांनी चार लाख नोटा सिरियलप्रमाणे दिल्या. बँकेत तपासले असता खरे असल्याचे समजले. त्यामुळे चार लाख रुपये मयूर यांनी परत केले. त्यानंतर आठ दिवसांनी कमीत कमी दोन कोटी रुपये असेल तरच व्यवहार होईल असे प्रशांत व सुरेश यांनी सांगितले. त्यामुळे मयूर यांनी दोन कोटी जमा केले. यावेळी दोन कोटींच्या बदल्यात तीन कोटी  घेऊन देतो असे प्रशांत याने सांगितले.२६ एप्रिल रोजी प्रशांत यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीकडे दोन कोटी दिले. त्यानंतर ती व्यक्ती रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या कारजवळ गेली व डिकी उघडून पैसे  ठेवले. त्यातून पोलिसांसारखे असणारे चार ते पाच अनोळखी व्यक्ती उतरल्या व ते कारमध्ये बसले. त्यानंतर प्रशांत यांनी पोलिसांनी पैसे पकडले असल्याचे सांगितले व लोणावळ्यात जाऊन थांबा पैसे परत मिळतील असे सांगितले. मयूर हे लोणावळ्यात बराच वेळ थांबले. यावेळी त्यांना दोन दिवसात पैसे परत करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशी सुरेश यांचा मुलगा अक्षय कदम याने दहा लाख रुपये मयूर यांना परत केले. व पुढील रक्कमेकरिता पैशांची मागणी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस