नवी मुंबई : बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडेंच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक केल्यानंतर चौथ्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. तो तळवळीचा राहणारा असून, घटनास्थळी पाळत ठेवण्याचे काम त्याने केले होते. व्यावसायिक वादातून बांधकाम व्यावसायिक प्रवीण तायडे याची ४ जूनला तळवली येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. तळवली व घणसोली परिसरात बांधकामे मिळविण्याच्या स्पर्धेतून जयेश पाटील व प्रवीण तायडे त्यांच्यात वाद सुरू होते. त्यानुसार, तायडे हा घटनेच्या दिवशी तळवली येथे आला असता, गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर तीन दिवसांत रबाळे पोलिसांनी जयेश याच्यासह इतर दोघांना अटक केली होती. त्यांचा चौथा साथीदार हा तायडेच्या तळवली येथील बांधकामावर लक्ष ठेवून होता.४ जूनला तायडे तिथे आल्याची खबर त्याने जयेशपर्यंत पोहोचवली होती. त्यामुळे जयेशच्या चौथ्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. सध्या चौघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.
तायडेंच्या हत्येप्रकरणी चौथ्या साथीदाराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:34 IST