शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारने दिली चार एफएसआयला तत्त्वत: मान्यता - मंदा म्हात्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2020 09:14 IST

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खासगी व सिडकोनिर्मित्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नवी मुंबई :  गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खासगी व सिडकोनिर्मित्त जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने या इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी ४ एफएसआयला तत्त्वत: मान्यता दिल्याचे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. पुनर्विकासासाठी सिडकोने चार एफएसआयचा प्रस्ताव तयार केला असून दोन दिवसांत तो राज्य सरकारला सादर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.सिडकोने चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची  इमारतींची पुनर्बांधणी करण्यासाठी यापूर्वीच्या सरकारने अडीच एफएसआय जाहीर केला होता. परंतु पुनर्विकासासाठी हा चटई निर्देशांक कमी असल्याने तो चार करावा, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी लावून धरली होती. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले होते. म्हात्रे यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी गेल्या महिन्यात आपल्या वर्षा निवासस्थानी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. सिडकोच्या माध्यमातून जुन्या इमारतींचा पुनर्विकास केल्यास नागरिकांना त्याचा अधिक फायदा होईल, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केले होते. तर सिडकोनेसुद्धा याबाबत सकारात्मक विचार करावा, असे मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांनी या वेळी सूचित केले होते. विशेष म्हणजे या बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्यात आल्याची माहिती मंदा म्हात्रे यांनी या वेळी दिली. सिडको दोन दिवसांत करणार अहवाल सादरसिडकोने कशा प्रकारे ४ एफएसआय देता येऊ शकतो याचे नियोजन केले असून यासंबंधीचा अहवाल दोन दिवसांत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. शासनाच्या अंतिम मंजुरीनंतर चार एफएसआयच्या मागणीवर शिक्कामोर्तब होईल, असा विश्वास मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला. चाळ‌ीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतीसिडकोने चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारतींची अल्पावधीतच पडझड सुरू झाली आहे. यातील बहुतांशी इमारती मोडकळीस आल्या असून महापालिकेने त्या धोकादायक घोषित केल्या आहेत. तसेच खासगी विकासकांनी बांधलेल्या इमारतींचीही दयनीय अवस्था झाली आहे.  वीस वर्षांपासून जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न रेंगाळला आहे. माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आताहा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांचे आपल्या इमारतीच्या पुनर्बांधणीचे स्वप्न साकार होणार आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी अडीच एफएसआयला मंजुरी दिली होती. अडीच एफएसआय पुरेसा नसल्याने तो चार करावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणीच्या पूर्ततेसाठी सकारात्मक कार्यवाही केली आहे.- मंदा म्हात्रे, आमदार

टॅग्स :Manda Mhatreमंदा म्हात्रेNavi Mumbaiनवी मुंबई