शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

नवी मुंबईमध्ये आरोग्य सर्वेक्षणासाठी ७२० पथकांची निर्मिती; दहा दिवसांमध्ये पाच लाख घरांना भेट देण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 00:46 IST

कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नवी मुंबईमध्ये अभियान यशस्वी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी जास्तीत पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेने शहरात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यासाठी ७२० पथकांची निर्मिती केली आहे. प्रत्येक पथक प्रतिदिन किमान ५० घरांना भेटी देऊन सर्वेक्षण करणार असून, दहा दिवसांमध्ये ५ लाखांपेक्षा जास्त घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविले जात आहे. नवी मुंबईमध्ये अभियान यशस्वी करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी जास्तीत पथके तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक पथकामध्ये दोन ते तीन कर्मचारी व स्वयंसेवकांचा समावेश असणार आहे. हे पथक घरोघरी जाऊन प्रत्येकाचे आॅक्सिजन सॅच्युरेशन व तापमान मोजले जाणार आहे. एखाद्या व्यक्तीला ताप, खोकला, घशात खवखवणे, थकवा, श्वास घेण्यास त्रास होत आहे का, हे तपासले जाणार आहे. मधुमेह, हृदयरोग, कर्करोग, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण, दम अशा सहव्याधी असणाऱ्या नागरिकांची माहिती संकलित केली जाणार आहे.नवी मुंबईत १५ सप्टेंबर ते १० आॅक्टोबरदरम्यान पहिला टप्पा व १४ ते २४ आॅक्टोबरदरम्यान दुसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणात एखाद्या व्यक्तीस ताप असेल व त्याचे तापमान १००.४ डिग्री फॅरेनाईट, तसेच आॅक्सिजन सॅच्युरेशन ९५ टक्के कमी असल्यास त्या व्यक्तीस नजीकच्या क्लिनिकला पाठविण्यात येणार आहे. या अभियानास नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.सोसायटींमध्ये घ्यावयाची काळजी- सोसायटीमधील लहान मुले, ज्येष्ठ नागरिक विनाकारण घराबाहेर जाणार नाहीत, याचीकाळजी घ्यावी.- सोसायटीमध्ये दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फूट अंतर राखून संवाद साधावा.- सोसायटीमध्ये बाहेरील व्यक्तीला थेट प्रवेश देऊ नये.- बाहेरून येणाºया व्यक्तीचे तापमान, आॅक्सिजन तपासणी करूनच आतमध्ये प्रवेश द्यावा.खरेदीसाठी जाताना- दुकाने, मंडई, मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना घरातील एकाच व्यक्तीने जावे.- खरेदीसाठी गेल्यानंतर तेथे प्रदर्शनार्थठेवलेल्या वस्तूंना शक्यतो स्पर्शकरणे टाळावे.कार्यालयामध्ये घ्यावयाची काळजी- शक्यतो वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावे.- कामावर जाण्यासाठी दुचाकीने जावे किंवा पायी चालत जावे.- बैठकांसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग पद्धतीचाअवलंब करावा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस