शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

फुटबॉलप्रेमींनी स्टेडिअम भरले, दिवाळीतही उत्साह कायम, २५ आॅक्टोबरला स्पर्धेची उपांत्य फेरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 06:55 IST

फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने नवी मुंबईत सुरू असून, मात्र जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या खेळाच्या नवी मुंबईत होणा-या सामन्यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

नवी मुंबई : फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने नवी मुंबईत सुरू असून, मात्र जागतिक स्तरावर लोकप्रिय असलेल्या या खेळाच्या नवी मुंबईत होणा-या सामन्यांना सर्वच स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नेरु ळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये हे सामने खेळले जात आहेत. १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक सामन्यांतील एकूण सामन्यांपैकी आठ सामने नवी मुंबईत होत आहेत. यापैकी बुधवारी झालेल्या सामन्याला फुटबॉलप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. २५ आॅक्टोबरला या स्पर्धेची उपांत्य फेरी होणार असून, या शेवटच्या सामन्याला देखील प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असे चित्र पाहायला मिळत आहे.दिवाळीच्या सुट्यांमुळे बुधवारी झालेल्या सामन्यांकरिता शहरातील अनेक संस्था, महाविद्यालये, नागरिकांनी फिफाच्या सामन्यांसाठी हजेरी लावली. यामध्ये वयोवृध्दांचा देखील समावेश होता. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यामुळे सामने पाहण्यासाठी जवळपास ३० हजार प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार नवी मुंबई महापालिकेनेही गेले सहा महिने फिफाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती, शहराचे सुशोभीकरणाचे काम केले. विविध सोयी-सुविधा आणि शहर सुशोभीकरणासाठी २० कोटींहून अधिक रु पये खर्च केले.या निमित्ताने सायन-पनवेल महामार्ग चकाचक झाला आहे. तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांची देखील डागडुजी करण्यात आली.वाहतूक विभागाची कारवाईवाहतूक विभागाच्या वतीने नो पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करत दंडात्मक वसुली करण्यात आली. नेरुळ एलपी परिसरात सामने सुरू होण्यापूर्वी वाहतूककोंडी झाली होती. मात्र, वाहतूक विभागाच्या वतीने प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेत अवघ्या काहीच मिनिटांमध्ये या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. प्रवेशद्वारावर पोलिसांचा कडक पहारा ठेवण्यात आला होता. याठिकाणी छेडछाडीसारखे गैरप्रकार घडणार नाही याची देखील खबरदारी घेण्यात आली होती.सुरक्षेकरिता चाचपणीसामन्यांकरिता स्टेडिअमच्या आत जाण्यापूर्वी सुरक्षारक्षकांद्वारे कडक तपासणी केली जात होती. टोपी, पगडीचीसुध्दा तपासणी करून आत सोडले जात होते. खाद्यपदार्थ, द्रवपदार्थ, लोखंडी वस्तू आत नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. १ ते ७ क्रमांकांच्या प्रवेशद्वारावर ४ हून अधिक सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच ठरावीक काळात याठिकाणी सुरक्षेविषयीच्या सूचना दिल्या जात होत्या.तिकिटांचा खप वाढलागेल्या आठवड्यातील सामन्यांच्या तुलनेत या सामन्याकरिता तिकिटांचा खप वाढला होता. शेवटच्या क्षणापर्यंत तिकिटांची विक्री सुरू होती. आॅनलाइन तिकीट विक्रीलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, तसेच आॅफलाइन तिकीट विक्री ही सामन्यांना सुरवात झाली असतानादेखील सुरूच होती.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Sportsक्रीडा