शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांना फ्लेमिंगोंची भुरळ, २५ हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो खाडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:27 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईमधील जैवविविधतेमध्येही वाढ होऊ लागली आहे. मनपा क्षेत्रामध्ये तब्बल १६८ प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नवी मुंबईमधील जैवविविधतेमध्येही वाढ होऊ लागली आहे. मनपा क्षेत्रामध्ये तब्बल १६८ प्रकारचे पक्षी आढळून आले आहेत. सद्यस्थितीमध्ये दिवा ते दिवाळेपर्यंतच्या खाडीमध्ये तब्बल २५ हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो दाखल झाले असून, पर्यावरणप्रेमींसाठी पक्षिनिरीक्षणाची पर्वणी ठरत आहे.नवी मुंबईला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. दिघा ते बेलापूरपर्यंत एक बाजूला डोंगररांगा असून, दुसºया बाजूला दिवा ते दिवाळेपर्यंत २२ किलोमीटरचा खाडीकिनारा लाभला आहे. तब्बल १४७५ हेक्टर जमिनीवर कांदळवन घोषित केले असून, उर्वरित २७४ हेक्टरवरील कांदळवनावर अद्याप संरक्षित वने म्हणून घोषित करण्याचे शिल्लक आहे.कांदळवनासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात जैवविविधता आढळून येऊ लागली आहे. तब्बल १६८ प्रकारचे पक्षी या परिसरामध्ये आढळून येत आहेत. याशिवाय ८० प्रकारचे सरपटणारे आणि उभयचर प्राणी, १४० प्रकारची फुलपाखरे, १२५ प्रकारचे मत्स्य जीव आढळतात. या परिसरातील बहुतांश पक्षी स्थलांतरित आहेत. नेरुळ परिसरातील खाडीकिनाºयावरील तलाव व ऐरोलीसह घणसोली परिसरातील मातीचे बांधदेखील विशिष्ट पक्ष्यांसाठी घरोब्याचे ठिकाण बनले आहे. ७७ प्रकारचे ३५ फॅमिली आणि १४ आॅर्डरशी निगडित असलेले पक्षी उरणपर्यंतच्या खाडीत आढळून येतात. या परिसरामध्ये आढळून येणाºया पक्ष्यांच्या विविध जातींमध्ये ४८ टक्के स्थानिक, स्थानिक स्थलांतर करणारे २३ टक्के व पूर्ण स्थलांतर करणारे २९ टक्के पक्षी आहेत.नवी मुंबईमध्ये नोव्हेंबर ते जून दरम्यान फ्लेमिंगोंचे मोठ्या प्रमाणात आगमन होत असते. सद्यस्थितीमध्ये २५ हजारांपेक्षा जास्त फ्लेमिंगो या परिसरामध्ये दाखल झाले आहेत. एनआरआय कॉम्प्लेक्समागील तलाव व टी. एस. चाणक्यच्या मागील बाजूला फ्लेमिंगोंचे थवे पाहावयास मिळत आहेत.राज्य शासनाने हा परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. मुंबईसह राज्यातून पक्षिनिरीक्षक या परिसरामध्ये अभ्यासासाठी येत आहेत. पक्षिप्रेमी पर्यटकही गर्दी करू लागले आहेत. ऐरोलीमधील जैवविविधता केंद्राच्या वतीने पक्षी पाहण्यासाठी बोटही उपलब्ध करून दिली जात आहे. पामबिच रोडवरून जाताना फ्लेमिंगो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. या परिसरामध्ये पूर्वी विदेशातून फ्लेमिंगो यायचे; परंतु आता नोव्हेंबर ते जून दरम्यान नवी मुंबई, उरण व शिवडी खाडीत मुक्काम करून हे पक्षी इतर कालावधीमध्ये गुजरात व इतर ठिकाणी स्थलांतर करत आहेत.निरीक्षणासाठीसुविधा नाही- राज्य शासनाने नवी मुंबईतील खाडीकिनारा फ्लेमिंगो अभयारण्य घोषित केले आहे.- सद्यस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षी या परिसरामध्ये दाखल झाले आहेत; पण पक्षिनिरीक्षकांसाठी काहीही सुविधा नाहीत.- टी. एस. चाणक्य परिसरामध्ये अनेक हौशी पर्यटक पक्षी पकडण्याचाही प्रयत्न करत आहेत. पक्ष्यांना हुसकावण्याचे प्रयत्नही सुरू असून अशीच स्थिती राहिली, तर भविष्यात या परिसरामध्ये पक्ष्यांचे आगमन कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.नवी मुंबई व मुंबई परिसरामध्ये १९९४पासून फ्लेमिंगोंचे आगमन होत आहे. लेझर व ग्रेटर फ्लेमिंगोच्या जाती या परिसरामध्ये पाहावयास मिळत आहेत; पण फ्लेमिंगोंच्या सुरक्षिततेसाठी फारशी दखल घेतलेली नाही. वनविभाग, शासन व मनपानेही यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात.- विजय शिंदे,पक्षिनिरीक्षक

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई