शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

ठाणे-बेलापूर मार्गावरील पाच उड्डाणपूल होणार चकाचक

By नारायण जाधव | Updated: December 19, 2023 18:52 IST

वाहनचालकांना मिळणार दिलासा : सहा कोटी ३४ लाख रुपये खर्च

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : देखभाल-दुरुस्तीअभावी ठाणे-बेलापूर मार्गावरील बहुतेक सर्वच उड्डाणपुलांची दुरवस्था झाली आहे. यात काही पुलांच्या पृष्ठभाग अनेक ठिकाणी खडबडीत झाला असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहने आदळून किंवा दुचाकी घसरण्याचे प्रकारही होत आहेत. यामुळे या मार्गावरील पाच उड्डाणपुलांची सहा कोटी ३४ लाख रुपये खर्चून दुरुस्ती करण्याचा निर्णय नवी मुंबई महापालिकेने घेतला आहे. ही दुुरुस्ती झाल्यावर वाहने सुसाट धावण्यास मदत होऊन वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

ठाणे-बेलापूर हा शहरातील सायन-पनवेलनंतर सर्वाधिक वर्दळ असणारा मार्ग आहे. टीटीसी औद्योगिक वसाहतीत ये-जा करणारी बहुतेक वाहने याच मार्गावरून मार्गक्रमण करतात. त्यातच गेेल्या काही दिवसांपासून टीटीसी औद्योगिक पट्ट्यात आयटी कंपन्या, डाटा सेंटरची संख्या वाढली आहे. यामुळे दुचाकींसह चारचाकींची वर्दळही वाढली आहे. याशिवाय जेएनपीएतून ठाण्याकडे जाणारी कंटेनर वाहतूकही याच मार्गाने होते. यामुळे हा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या मार्गावरील पाच उड्डाणपुलांच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला आहे.

असा होणार दुरुस्तीवर खर्च

तळवली उड्डाणपूल : ४,४२,६०,८२६कोपरखैरणे उड्डाणपूल : ५७,९२,९२९सविता उड्डाणपूल : ४२,१२,३०२ऐरोली उड्डाणपूल : २७,८३,३८८घणसोली उड्डाणपूल : ६३,२४,३४०ठाणे-बेलापूर रस्त्यावरील काही उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने लहान-मोठे अपघात होऊन वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याबाबत नवी मुंबई वाहतूक पोलिसांनीदेखील महापालिकेस अवगत करून या पुलांची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापालिकेेने पाच उड्डाणपुलांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या बाबतची निविदाप्रक्रिया सुरू आहे. पाच कामांची निविदाप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र ठेकेदारास कार्यादेश दिल्यानंतर त्यांनी दोन महिन्यांत सर्व उड्डाणपुलांची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे. - संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :highwayमहामार्ग