शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

प्लॅस्टिक कचऱ्यामुळे मासेमारी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 04:44 IST

जलप्रदूषण रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी

- अनंत पाटीलनवी मुंबई : खाडीकिनारी वाहून येणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकोलमुळे शहरातील पारंपरिक मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जलप्रदूषण करणाºया रासायनिक कारखान्यांसह संबंधित घटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमारांनी केली आहे.पालघरपासून थेट सिंधुदुर्गपर्यंतच्या खोल समुद्रात स्थानिक मच्छीमार मासेमारी करतात. त्यासाठी बोटीतून १० ते १५ दिवस प्रवास करतात; परंतु अलीकडच्या काळात भरतीच्या पाण्याबरोबर माशांऐवजी प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा कचरा मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकत आहे, त्यामुळे जाळे फाटून मच्छीमारांचे नुकसान होत आहे. जाळ्यात मासेही सापडत नाहीत आणि नुकसानही होत असल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत.समुद्रात तीन प्रकारची मासेमारी केली जाते. डोलनेट, गिलनेट आणि पर्सिनेट अशा प्रकारे असून, डोलनेट म्हणजे स्थित मासेमारी प्रकारात पारंपरिक पद्धतीने लहान बोटीतून दररोज मासेमारी केली जाते. गिलनेट बोटीतून चार ते पाच दिवसांचा प्रवास करून मासेमारी केली जाते. तर पर्सिनेट मासेमारी ट्रॉलर बोटीतून १० ते १५ दिवसांचा प्रवास करून खोल समुद्रात मासेमारी केली जाते. यात दररोज मासेमारी करणाºया डोलनेट मच्छीमारांना प्लॅस्टिक आणि थर्माकोल कचºयाचा मोठा फटका बसत आहे.निवठ्या, खेकडे, आंग्रे, थिरले, खरबी मासे आणि लहान कोळंबी (जवळा) हा मासळीचा प्रकार खाडीकिनारी चिखलात सापडतो; पण प्लॅस्टिक, थर्माकोल तसेच पाण्यावर पसरणारे तेलाचे तवंग आदीमुळे ही मासळी मिळणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे.त्यामुळे आणि भरतीबरोबर तेलतवंगामुळे ही मासळी फारशी मिळत नाही. अंडी उबविण्यासाठी ही मासळी मार्च आणि एप्रिलमध्ये खोल समुद्रात जाते, त्यानंतर पावसाळ्यात किनाºयावर येते. मात्र, किनाºयावर वाहून येणाºया प्लॅस्टिक व थर्माकोलच्या कचºयामुळे यामाशांचे अस्तित्वही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.राज्य शासनाने प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा वापर आणि उत्पादनावर बंदी घातली आहे. प्रभावी कार्यवाही केल्यास समुद्र आणि खाडीत आढळणाºया प्लॅस्टिक आणि थर्माकॉलच्या कचºयाला आळा बसेल. तसेच प्रक्रिया न करता रासायनमिश्रीत पाणी खाडीत सोडणाºया कारखान्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांची मागणी आहे. विशेष म्हणजे, खाडी आणि समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे माशांच्या प्रजनन प्रक्रियेवर परिणाम झाला आहे, त्यामुळे मासळीच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.रायगडच्या किनारपट्टीसह ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील स्थानिकांचा मासेमारी हा पारंपरिक व्यवसायआहे; परंतु हा व्यवसायही आता संकटात सापडल्याने खाडी आणि समुद्रातील प्रदूषण रोखण्यासाठी राज्य शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारNavi Mumbaiनवी मुंबई