शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईतून पुढच्या वर्षी पहिले टेकऑफ, सिडकोचा दावा, विमानतळाचे ६३ टक्के काम पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 06:43 IST

यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचेही  स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई : देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. ३१ मार्च २०२५ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, असा दावा करण्यात येत आहे. सध्या येथील कामाने वेग घेतला असून, आतापर्यंत ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचेही  स्पष्ट केले आहे.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएपीए) अदानी समूहाद्वारे रायगड जिल्ह्यातील पनवेलनजीकच्या  १६०० हेक्टर जागेवर हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. यात सिडको ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. या प्रकल्पासाठी  १९ हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे.  

दरम्यान, सध्या पहिल्या दोन टप्प्याच्या कामावर भर दिला जात आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम त्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. 

पाच टप्प्यात प्रकल्प पूर्णहा ग्रीनफिल्ड प्रकल्प ५ टप्प्यात पूर्ण हाेणार आहे. पहिल्या दोन टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. पहिल्या टप्प्याचे ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यावर विमानतळाला चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी असतील. तसेच विमानतळावर उत्तम दर्जाची रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जल कनेक्टिव्हिटीचे नियोजन केले आहे.

  निर्धारित कालावधीत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार एक धापवट्टी आणि टर्मिनल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.   एकूणच प्रकल्पाच्या कामाची गती पाहता, यावेळी तरी विमानतळाची डेडलाइन हुकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको