शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रसायनांबाबत अग्निशमन अधिकारीच अनभिज्ञ, दुर्घटनेवेळी घालावा लागतोय जीव धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 05:40 IST

Fire News : एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये साठा असलेल्या रसायनांबाबत स्थानिक अग्निशमन केंद्र अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे तळोजासारख्या दुर्घटनेवेळी अग्निशमन जवानांना जीव धोक्यात घालावा लागला होता.

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : एमआयडीसी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये साठा असलेल्या रसायनांबाबत स्थानिक अग्निशमन केंद्र अनभिज्ञ असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे तळोजासारख्या दुर्घटनेवेळी अग्निशमन जवानांना जीव धोक्यात घालावा लागला होता.औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये साठा असलेल्या रसायनांची माहिती अग्निशमन केंद्रांकडे उपलब्ध नाही. यामुळे आगीची घटना घडल्यास त्या ठिकाणी बचावकार्य करताना अडथळे येत आहेत. तर आगीत नेमके कोणते रसायन जळत आहे याची माहिती नसल्याने जीव धोक्यात घालावा लागत आहे. अशाच प्रकारातून तळोजा येथील मोदी कंपनीची आग विझविताना विषारी वायूची बाधा होऊन अग्निशमन जवान बाळू देशमुख यांना जीव गमवावा लागला आहे.दरम्यान, कंपनीतील क्लोरिनचे टनेल व पाचशे किलोहून अधिक ब्रोमिनचा साठा आगीत सापडला असता तर तळोजासह लगतच्या परिसराला धोका होता. त्यामध्ये भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली असती. ते टाळण्यासाठी तळोजा अग्निशमन अधिकारी दीपक दोरगुडे व त्यांच्या जवानांसह मदतीला आलेल्या इतर अग्निशमन जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून संभाव्य दुर्घटना टाळली. मात्र कंपनीतल्या घातक रसायनांची पूर्वकल्पना अग्निशमन केंद्राला असती तर बचाव कार्य निर्विघ्न झाले असते. परंतु राज्यातल्या सर्वच औद्योगिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या चाचणीचे अधिकार औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय (डिस्ट) यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडून स्थानिक अग्निशमन केंद्राला कंपन्यांमधील रासायनिक साठ्याबद्दल कल्पना दिली जात नाही. परिणामी, एखाद्या कंपनीत आगीची दुर्घटना घडल्यास, जीव धोक्यात घालून बचावकार्य करावे लागत आहे. तळोजा दुर्घटनेच्या निमित्ताने विभागीय चौकशी केली जाणार आहे. सुधारित कायद्यानुसार औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांच्या चाचणीचे अधिकार ‘डिस्ट’कडे आहेत. त्यामुळे कंपन्यांमधील रासायनिक साठ्याबद्दल अग्निशमन केंद्राकडे माहिती उपलब्ध नसते.- एम. व्ही. ओगले, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, राज्य. 

टॅग्स :Fire Brigadeअग्निशमन दलNavi Mumbaiनवी मुंबई