शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीतील सिलिंडर स्फोटात अग्निशमनचे कर्मचारी जखमी, पंपहाउसमध्ये सुरक्षारक्षकांचा निवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 03:24 IST

आग विझवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : आग विझवत असताना अचानक सिलिंडरचा स्फोट होऊन अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोसायटीकडून इमारतीच्या पंपहाउसमध्ये बेकायदेशीरपणे सुरक्षारक्षकाच्या राहण्याची सोय करण्यात आलेली होती. या ठिकाणी खाद्यपदार्थ शिजवताना कपड्यांनी पेट घेतल्याने आग लागली. त्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या दोनपैकी एका सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामध्ये पंपहाउसची भिंती फुटून परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे.ऐरोली सेक्टर ८ येथील कृष्णा हाईट या इमारतीमध्ये शनिवारी रात्री ८च्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या पंपहाउसमध्ये आग लागल्याची माहिती ऐरोली अग्निशमन दलाला मिळाली होती. त्यानुसार, अग्निशमनचे अधिकारी व कर्मचारी त्याठिकाणी गेले होते. त्यांच्याकडून पंपहाऊसमधील आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, आतील सिडरचा स्फोट झाला. यामुळे पंप हाउसची भिंती फुटून विटांचे तुकडे व इतर साहित्य उडून अग्निशमन कर्मचाऱ्यांवर कोसळले. यामध्ये सहायक केंद्र अधिकारी एकनाथ पवार, आर. आर. कोकाटे व एस. बी. परब हे तिघेजण जखमी झाले. त्यांंच्यावर चेहºयावर, शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत.पंपहाउसमध्ये सिलिंडर असल्याची कल्पना अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेली नव्हती. सोसायटीकडून सुरक्षारक्षकाच्या राहण्याची सोय इतरत्र करणे आवश्यक असतानाही पंपहाउसमध्येच सुरक्षारक्षकाचे घर बनवण्यात आले होते. सुरक्षारक्षकानी स्वयंपाकासाठी त्या ठिकाणी दोन गॅस सिलिंडरदेखील ठेवले होते. त्यापैकी एक सिलिंडर वीजमीटरच्या जवळच ठेवण्यात आला होता.यामुळे आग सिलिंडरपर्यंत पसरताच त्याचा स्फोट होऊन पंपहाउसची भिंत फुटली आणि स्फोटात अग्निशमनचे कर्मचारी जखमी झाले.यानंतरही अग्निशमनच्या कर्मचाºयांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग इमारतीपर्यंत पसरली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. या घटनेमुळे सुरक्षारक्षकांच्या वास्तव्यासाठी पंपहाउस अथवा जिन्याखालील जागांचा होत असलेला वापर धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBlastस्फोट