शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्सच्या इमारतीला आग, लाखोंचे साहित्य जळाले, अडीच तासांमध्ये आग नियंत्रणामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 05:03 IST

ठाणे-बेलापूर रोडवरील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीमध्ये सुरू असलेल्या रिलायन्स रुग्णालयाच्या तिस-या मजल्यावर सोमवारी दुपारी आग लागली. इमारतीमध्ये बसविण्यासाठी आणलेले वातानुकूलित यंत्र, रंग व इतर साहित्याने अचानक पेट घेतल्याने ही दुर्घटना झाली असून त्यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवरील धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीमध्ये सुरू असलेल्या रिलायन्स रुग्णालयाच्या तिसºया मजल्यावर सोमवारी दुपारी आग लागली. इमारतीमध्ये बसविण्यासाठी आणलेले वातानुकूलित यंत्र, रंग व इतर साहित्याने अचानक पेट घेतल्याने ही दुर्घटना झाली असून त्यामध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.कोपरखैरणे रेल्वे स्टेशनसमोर धीरूभाई अंबानी नॉलेज सिटीच्या प्रवेशद्वाराजवळच रिलायन्स समूहाच्यावतीने रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. सहा मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून आतमधील पीयूपी, फर्निचर व अंतर्गत सजावटीचे काम वेगाने सुरू आहे. रोज शेकडो कर्मचारी रुग्णालयाचे काम पूर्ण करण्यामध्ये व्यस्त आहेत. तिसºया मजल्यावर साहित्य ठेवण्यासाठी गोडावून करण्यात आले असून दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक तेथे आग लागली. शॉर्टसर्किटमुळे किंवा वेल्डिंगच्या कामामुळे आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. डीएकेसीमधील यंत्रणेच्या साहाय्याने आग विझविण्याचे काम सुरू करण्यात आले. पावणे अग्निशमन केंद्र दोन किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तेथूनही दोन वाहने तत्काळ घटनास्थळी आली. याशिवाय वाशी अग्निशमन दलाचाही एक टँकर बोलावण्यात आला. सहा वाहनांच्या साहाय्याने अडीच तासांमध्ये आग पूर्णपणे आटोक्यात आणली.अचानक लागलेल्या आगीमुळे इमारतीमध्ये काम करणाºया कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु येथील सुपरवायझर व सुरक्षा रक्षकांनी सर्व कर्मचाºयांना तत्काळ खाली नेले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ठाणे-बेलापूर रोडनजीकच रेल्वे स्टेशनच्या समोर ही घटना घडली असल्यामुळे पाच ते सहा हजार नागरिकांचा जमाव या परिसरामध्ये जमा झाला होता. अखेर पोलिसांनी नागरिकांना तेथून हुसकावून लावल्यामुळे अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना आग विझविताना होणारे अडथळे दूर केले.पोलिसांनी हटविली गर्दीआग लागल्याचे वृत्त समजताच कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. बी. देशमुख तत्काळ घटनास्थळी हजर झाले. सर्व्हिस रोडवर व पादचारी पुलावर पाच ते सहा हजार नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकांनी मोटारसायकल सर्व्हिस रोडवर उभ्या केल्या होत्या.यामुळे अग्निशमन दलाची वाहने ये - जा करण्यासाठी अडथळा निर्माण होवू लागला होता. देशमुख यांनी स्वत: हातामध्ये काठी घेवून विनाकारण गर्दी करणाºयांना तेथून हुसकावून लावले. मोटारसायकल बाजूला करून रोड मोकळा केला व दोन्ही बाजूला दोरीच्या साहाय्याने तात्पुरता अडथळा निर्माण करून अग्निशमन अधिकारी व कर्मचाºयांच्या कामातील अडथळा दूर केल्याने उपस्थितांनीही त्यांचे कौतुक केले.

टॅग्स :fireआग