शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

दगडखाण मालकावर होणार गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:07 IST

आयुक्तांचे प्रशासनास आदेश : डी. वाय. पाटील व्यवस्थापनालाही नोटीस; धोकादायक घरे रिकामी करण्याच्याही सूचना

नवी मुंबई : एमआयडीसीमध्ये नाला बुजवून रस्ता तयार करणाऱ्या दगडखाण मालकावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी दिले आहेत. इतर खाणमालकांनाही नोटीस देण्यात याव्यात. नेरुळमध्ये डॉ. डी. वाय. पाटील मैदानामुळे शेजारील वसाहतीमध्ये पाणी जात असून संबंधितांनाही नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्ये डेब्रिज माफियांनी नैसर्गिक नाल्यामध्ये बांधकामाचा कचरा टाकला आहे. अनेक दगडखाणीमधील कचरा नाल्यांमध्ये गेला आहे. सोमवारी नाल्यातील पाणी बोनसरीमधील घरांमध्ये गेल्याने रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी अधिकाऱ्यांसोबत या परिसराची पाहणी केली.

येथील महावीर कॉरीजवळील चार झोपड्या पावसाच्या पाण्याने वाहून गेल्या. जवळपास १५ घरांमध्ये पाणी गेले. यामुळे विस्थापित झालेल्यांची तुर्भे इंदिरानगरमधील शाळेमध्ये तात्पुरती सोय केली आहे. बोनसरीजवळ पी. एम. शेख या दगडखाणमालकाने त्याच्या खाणीकडे जाण्यासाठी नाल्यावर रस्ता बनविला आहे. यामुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बंद झाला असल्याने संबंधितांना आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार नोटीस बजाविण्यात यावी व गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिले आहे.

पेंटर कॉरी व ओंकार कॉरी चालकांकडून नाल्यातील अडथळे काढून घेण्याचे काम दिवसभर सुरू होते. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या मागील बाजूस आर्मी कॉलनी जवळील रस्त्यावर पाणी साचण्याच्या जागेचीही पाहणी केली. मैदानातून मोठ्या प्रमाणात पाणी रोडवर येत असल्यामुळे संंबंधितांना नोटीस पाठविण्यात यावी व पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापनाबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. नवी मुंबईचा काही भाग समुद्र सपाटीपासून खालच्या पातळीवर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला किंवा त्याच दरम्यान भरती असल्यास शहरात काही ठिकाणी पाणी साचते. जास्त पाणी साठणाºया ठिकाणी पाणीउपसा पंप व अनुषंगिक व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. सोमवारी २४ तासांमध्ये १२८ मि.मी. पाऊस पडला. सकाळी ८.३० ते दुपारी १२.३० या चार तासांमध्ये तब्बल ८१ मि.मी. पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. आयुक्तांच्या पाहणी दौºयामध्ये शहर अभियंता सुरेंद्र पाटील, परिमंडळ एकचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे, मनोज पाटील, सहायक आयुक्त संध्या अंबादे, संजय तायडे, राजेंद्र सोनावणे व इतर उपस्थित होते.तुर्भेतील शाळेला नोटीसतुर्भे सेक्टर २१ व २० येथील सखल भागात पाणी साचण्याच्या ठिकाणांचीही पाहणी करण्यात आली. या ठिकाणी पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पाणी उपसा पंपामध्ये वाढ केली होती; परंतु येथील अंजुमन शााळेलगत पावसाळी पाणी वाहून नेण्याकरिता असलेले गटार शाळेने बंद केल्याने त्या भागात पाणी साठल्याचे निदर्शनास आल्यामुळे शाळेलाही नोटीस पाठविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.बोनसरीमध्ये संरक्षण भिंत होणारबोनसरी भागातील नैसर्गिक नाल्यालगतच्या वसाहतीमध्ये सोमवारी पाणी जाऊन नागरिकांचे नुकसान झाले. येथील नाल्यामधील मोठे दगड व इतर अडथळे काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आयुक्तांनी स्वत: या परिसराची पाणी केली. पुन्हा या ठिकाणी अशाप्रकारची घटना घडू नये, यासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठीची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात यावी, अशा सूचनाही अभियांत्रिकी विभागाला दिल्या आहेत. आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनामुळे किमान पुढील वर्षी पावसाचे पाणी वसाहतीमध्ये शिरणार नाही, अशी अशा रहिवाशांना वाटू लागली आहे.तुर्भेमध्येही भिंत बांधण्याच्या सूचनाठाणे-बेलापूर व सायन-पनवेल महामार्गाच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. शरयू मोटर्सजवळही पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक नाल्याची खोली वाढविण्याचेही आयुक्तांनी प्रशासनाला सूचित केले असून दोन्ही बाजूला संरक्षण भिंत बांधण्याचे निर्देश दिले.