तळोजा : खांदा कॉलनी पोलीस ठाण्यात नगरसेविका सीता पाटील यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परिवर्तन या सामाजिक संस्थेचे महादेव वाघमारे यांनी सामाजिक दृष्टिकोनातून आमसभेत खांदा वसाहतीच्या परिसरात वीज चोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याची बाब समोर आणून देत, या परिसरातील महावितरण अधिकारी व काही राजकीय मंडळींचा गोरखधंदा चालू असल्याचे मत मांडले. यानंतर नगरसेविका सीता पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वाघमारे यांना तू आता नेता होतोस का? तुला सभेत वीजचोरीचा प्रश्न मांडायची काय गरज होती? असे म्हणत पती व इतर दोघांनी वाघमारे यांना जातीवाचक शब्द उच्चारत मारहाण केली असल्याची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. वाघमारे यांना योग्य न्याय मिळण्यासाठी परिवर्तन संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. (वार्ताहर)
पनवेलच्या नगरसेविकेवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
By admin | Updated: November 4, 2015 23:31 IST