शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रेहान कुरेशीविरोधात दोषारोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 00:21 IST

राज्यभर खळबळ उडवणाऱ्या पॉक्सोच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या रेहान कुरेशीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नवी मुंबई : राज्यभर खळबळ उडवणाऱ्या पॉक्सोच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या रेहान कुरेशीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. कोपरखैरणे व नेरुळ येथील दोन गुन्ह्यांच्या तपासाचा त्यात समावेश आहे. त्यानुसार हा खटला चालवण्यासाठी पोलिसांनी शासनाकडे विशेष सरकारी वकिलाची मागणी केली आहे.पॉक्सोच्या २० हून अधिक गुन्ह्याप्रकरणी रेहान कुरेशी (३४) याला नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याने नवी मुंबईसह पालघर, ठाणे व मुंबई परिसरात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे केले आहेत. तर २०१० मध्ये कुर्ला येथे दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारानंतर हत्येचे गुन्हेही त्यानेच केल्याचे तपासात उघड झाले आहे; परंतु एकापाठोपाठ एक सलग गुन्हे करत असतानाही अद्यापपर्यंत तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर ५०० हून अधिक तासांच्या सीसीटीव्ही फुटेजच्या केलेल्या तपासामुळे अवघ्या चालण्याच्या शैलीवरून गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश वाघमारे यांनी त्याला शिताफीने पकडले. चौकशीत त्याने कबूल केलेल्या गुन्ह्यांचा पोलीस तपास करत आहेत. त्यापैकी कोपरखैरणेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार व नेरुळमधील मुलीवर बलात्काराचा प्रयत्न या दोन गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी पूर्ण केला आहे. या दोन्ही गुन्ह्याप्रकरणी कुरेशीवर पॉक्सोचा गुन्हा दाखल आहे. त्याचे दोषारोपपत्र शुक्रवारी गुन्हे शाखा पोलिसांनी न्यायालयापुढे सादर केले. त्यामध्ये तपासाच्या तांत्रिक बाबींसह इतर अनेक सबळ पुराव्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. लवकरच हा खटला सुरू होणार असल्याने सर्वांचेच निकालाकडे लक्ष लागले आहे.