शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन क्लासेसच्या नावाखाली शुल्क वसुली, लॉकडाऊनमुळे पालकवर्ग अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 00:33 IST

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालयांकडून जून महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे.

कळंबोली -  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शाळा महाविद्यालय बंद आहेत, परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा, महाविद्यालयांकडून जून महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. पनवेलमधील काही खासगी शाळेकडून आॅगस्ट महिन्यापासून १ली ते ८वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. आॅगस्ट महिना संपत आल्याने, पालकांकडे चक्क जूनपासूनच्या फीसाठी तगादा लावला जात आहे. याकडे शिक्षण विभागाने लक्ष घालण्याची मागणी पालकांनी केली आहे.पनवेल तालुक्यात मराठी व इंग्रजी माध्यमाच्या २९६ खासगी शाळा आहेत. मार्च-एप्रिल महिन्यातील परीक्षाही रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानुसार, १ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता, त्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला. शिक्षण विभागांकडून विद्यार्थ्यांचे २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, म्हणून जूनपासून आॅनलाइन शिक्षण देण्यासाठी शाळांना सांगण्यात आले. त्यानुसार, पनवेल परिसरातील काही शाळेकडून जून महिन्यात तर काही शाळेकडून आॅगस्ट महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू करण्यात आले आहे. आॅगस्ट महिन्यात आॅनलाइन क्लासेस सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडून चक्क जूनपासूनच्या फीची सक्ती करण्यात आली आहे. जून आणि जुलै महिन्यात शाळेकडून आॅनलाइन क्लासेस सुरू नसताना फी कसली घेता, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.लॉकडाऊन काळातील फी शाळेने आकारू नये, असे शिक्षण विभागांकडून आदेश देण्यात आले आहे, तरी आॅनलाइनच्या नावाखाली पालकांना दोन महिन्यांच्या फीसाठी तगादा लावला जात आहे. तशी पालकांनी गट शिक्षण अधिकारी नवनाथ साबळे यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबत शिक्षण विभागांकडून फीसाठी तगादा लावू नये, असे शाळांना पत्र देण्यात आले असल्याचे गट शिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांनी सांगितले.लॉकडाऊन काळातील फी शाळेने आकारू नये, असे शिक्षण विभागांकडून आदेश देण्यात आले आहे, तरी आॅनलाइनच्या नावाखाली पालकांना दोन महिन्यांच्या फीसाठी तगादा लावला जात आहे.फीमध्ये विविध अ‍ॅक्टिव्हिटीचाही समावेशशाळेकडून आॅगस्टमध्ये आॅनलाइन क्लासेस सुरू केले आहे, तर जूनपासूनच्या फीसाठी पालकांना एसएमएस पाठवून फी भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. आॅनलाइन फीसोबत स्पोर्ट फी अशा विविध अ‍ॅक्टिव्हिटी फीचा समावेश करून शुल्क भरण्यास पालकांना सांगितले जात आहे. शाळा सुरू नाहीत, मग विविध अ‍ॅक्टिव्हिटीच्या फी कशासाठी घेता, असा सवाल पालकांकडून विचारला जात आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpanvelपनवेलSchoolशाळा