ठाणो : मुलाने पत्नीच्या साहाय्याने वडिलांची सुमारे 15 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार लोकमान्यनगर, पाडा क्रमांक-3 येथे घडला आहे. या प्रकरणी अरुण बुद्धिवंत यांनी फसवणूक झाल्याची तक्रार वर्तकनगर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अरुण यांना त्यांच्या पत्नीने 1995मध्ये घटस्फोट दिला होता. त्यामुळे मुलगा नीलेश याच्यासोबत ते वेगळे राहत होते. मधल्या काळात लग्न झाल्यानंतर मुलगा वेगळा राहत होता. सेवानिवृत्त असलेल्या अरुण यांनी 1क् जानेवारी 2क्क्8 रोजी मुंबईच्या पॅनकार्ड क्लबमध्ये 7 लाख 49 हजार गुंतविले होते. त्यापोटी 1क् जानेवारी 2क्14 रोजी 14 लाख 99 हजार 4क्क् रुपये मिळणार होते. वडिलांना इतकी मोठी रक्कम मिळणार म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहा, असा आग्रह मुलगा आणि सुनेने जुलैपासून धरला होता. पण, बुद्धिवंत यांनी या गोष्टीला नकार दिल्यावर नीलेश आणि नीलिमा यांनी त्यांना शिवीगाळ करीत दमदाटी केली. दोघांनी त्यांना धमकावून पॅनकार्डच्या मुंबईतील कार्यालयात नेले. तिथे जबरदस्तीने त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर, कोर्टनाका इथेही स्टॅम्पपेपरवर त्यांच्या काही सह्या घेतल्या. कळव्यातील बँक ऑफ इंडियामध्ये या तिघांच्या नावे संयुक्त खाते उघडण्यात आले आणि पॅनकार्डकडून मिळालेला सुमारे 15 लाखांचा धनादेश या खात्यात भरून त्यातला एकही पैसा बुद्धिवंत यांना देण्यात आला नाही. आपल्याच मुलगा आणि सुनेने अशी फसवणूक केल्याने हतबल झालेल्या बुद्धिवंत यांनी तक्रार नोंदविली आहे. (प्रतिनिधी)