शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

किरकोळ कारणावरून कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2020 01:52 IST

किरण पाटील (४५) असे हल्ला करून पळ काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नवी मुंबई : किरकोळ कारणावरून एका व्यक्तीने कुटुंबातील व्यक्तींवर जीवघेणा हल्ला करून पळ काढल्याचा प्रकार घणसोली गावात घडला आहे. यामध्ये सहा जण जखमी झाले असून, त्यात त्याच्या दिव्यांग मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.किरण पाटील (४५) असे हल्ला करून पळ काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचा घणसोली गावातील चौकालगत पानटपरीचा व्यवसाय असून, काही अंतरावरच वडिलोपार्जित दुमजली घर आहे. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या भावाने काही दिवसांपूर्वी घराच्या दुरुस्तीचे काम केले होते. त्याचे सामान अनेक दिवस खाली पडून असल्याच्या कारणावरून किरण याचा वाद झाला होता. या प्रकरणापासून त्यांच्यात सतत किरकोळ वाद सुरूच होते. तर त्याच्या भांडखोर स्वभावामुळे पत्नी व मुलगीही वेगळे राहत आहेत. शनिवारी दुपारी सर्व जण एकाच ठिकाणी असताना किरण हा त्या ठिकाणी आला. या वेळी त्याने पुन्हा भांडण काढले असता, सोबत आणलेल्या चाकूने त्याने घरातील सदस्यांवर वार केले. तर स्वत:च्या दिव्यांग मुलीलाही लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. या वेळी तिथे आलेल्या एका भाडोत्रीवरही त्याने वार करून पळ काढला. त्याच्या या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये भाऊ शंकर पाटील, वहिनी अलका पाटील, पत्नी रेखा पाटील व भावाची मुलगी शिवांगी पाटील यांचा समावेश आहे. तर किरण याच्या दिव्यांग मुलीलाही दुखापत झाली आहे.या प्रकरणी किरण पाटील याच्यावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवरकर यांनी सांगितले. तर कौटुंबिक वादातूनच त्याने हा हल्ला केल्याचेही प्राथमिक तपासात समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलीस किरण पाटील याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी