शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुचाकी रॅलीत महिलांची फॅशन परेड, पनवेलमध्ये अनोखे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 06:46 IST

शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी झाशीची राणी, शंभूराजे, बाजीप्रभू, नवरा-नवरी, क्रिकेटर अशा वेगवेगळ्या वेशभूषेत सुमारे १०० महिला दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभाग नोंदवला. त्यांचे काही सोसायट्यांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.

पनवेल - शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या महिला दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शनिवारी सकाळी झाशीची राणी, शंभूराजे, बाजीप्रभू, नवरा-नवरी, क्रिकेटर अशा वेगवेगळ्या वेशभूषेत सुमारे १०० महिला दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभाग नोंदवला. त्यांचे काही सोसायट्यांमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले.जागतिक महिलादिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ होते. महिलांच्या पेट्रोलवर चालणाºया दुचाकीच्या रॅलीमुळे पनवेलकरांना दुचाकीवरून फॅशन परेड पाहण्याची संधी मिळाली. रॅलीत सहभागी झालेल्या ८४ वर्षांच्या प्रतिभा दळवी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.रंगनिल इंडो फाउंडेशन, गोमाता नॅचरल्स , प्लॅनेटी मनी, मायक्रोन मेट्रोपोलीस यांच्यातर्फे पनवेलमध्ये पहिल्यांदाच अशी आगळी वेगळी रॅली काढण्यात आली होती. शनिवारी सकाळी ८.३० वाजता आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत रॅलीला सुरुवात झाली. त्यापूर्वी आमदार व खंडाळा येथील महिला पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या प्राचार्य स्मिता पाटील यांनी स्पर्धकांना रॅलीची थीम समजावून सांगितली. बाजीप्रभू बनलेल्या मानसी करंदीकर, हवाहवाई फेम श्रीदेवी बनलेल्या स्मिता झेमसे, फलंदाज सीमा बाबेल, नवरा-नवरी बसलेल्या वर्षा ठाकरे व मंजू अमिन, सैनिक वेशभूषेतील शिल्पा चांदणे व अरुंधती बनसोडे, तर शंभूराजे व येसूबार्इंच्या वेषातील योगिता देशमुख, प्रीती मोरे यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.नवीन पनवेल, खांदा वसाहतीमधून परतत मिडलक्लास सोसायटीत रॅली संपली. त्यानंतर खंडाळा येथील महिला पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या महिला छात्रांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवली. उपमहापौर चारुशीला घरत, सभागृहनेते परेश ठाकूर, अर्चना ठाकूर, वर्षा ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, ममता म्हात्रे, पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, विभा चव्हाण यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला.या वेळी महिला पोलीस ट्रेनिंग स्कूलच्या प्राचार्य स्मिता पाटील यांनी ‘हेल्मेट घातले नाही तर यमराज वाट पाहत आहे’, हा चांगला संदेश दिला. कल्पना लोखंडे, मिसेस महाराष्ट्र २०१८ किरण राजपूत, शीतल ठक्कर व मुक्ता गुप्ते यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.स्पर्धेचा निकालवेशभूषा : वैयक्तिक- १. कविता ठाकूर (धरती माता), २. सीमा बाबेल (फलंदाज), ३. मानसी करंदीकर (बाजीप्रभू).दोघांमध्ये- १. संचिता/रचना, २. योगिता/प्रीती, ३. मनोरमा/भाग्यश्री.बाईक सजावट : वैयक्तिक :१. ललिता बोराले (झाशीची राणी घोडा), २. रीना परमा, ३. नीता कोटकदोघांची : १. संचिता जोशी/रचना,२. अपर्णा/मनीषा, ३. ख्याती/कविता,बेस्ट थीम : फेस आॅफ वुमेन .. बालपणापासून वृद्धावस्थेपर्यंत.उत्तेजनार्थ : निशिगंधा पाटील, शिल्पा/ अरु ंधती, ज्येष्ठ महिला प्रतिभा दळवी.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWomen's Day 2018महिला दिन २०१८