शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याचे शेतकरी म्हणतात, माघार नाहीच; खिशातील पैसे खर्च करून आंदोलनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 08:07 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारपासूनच आंदोलक येण्यास सुरुवात झाली होती.

नवी मुंबई : हटायचे नाही, झुकायचे नाही, आरक्षण घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही, असा निर्धार जालना, परभणी, नांदेडसह मराठवाड्यातून आलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. प्रत्येक गावातून घराघरातून नागरिक आंदोलनात सहभागी झाले आहेत. खिशातील पैसे खर्च करून वाहनांचा बंदोबस्त केला आहे. जेवणापासून राहण्यापर्यंत सर्व तयारी करूनच लढ्यात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारपासूनच आंदोलक येण्यास सुरुवात झाली होती. अनेक जण १७ जानेवारीपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. मुक्कामाच्या ठिकाणची तयारी, वैद्यकीय तपासणी व इतर आवश्यक कामे करण्यासाठी अनेक जण पुढे आले होते. या सर्वांची मसाला मार्केटमध्ये सोय केली होती. माथाडी कामगार, व्यापारी व सकल मराठा समाजाने या सर्वांच्या अंघोळ, पाणी व जेवणाची सोय केली होती. मराठा आंदोलनाच्या लढ्यामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या. मराठा क्रांती मोर्चा व त्या अगोदरपासूनही चळवळीमध्ये सक्रिय आहे. आता निर्णायक लढा सुरू आहे. अंतरवाली सराटी ते नवी मुंबईपर्यंतच्या प्रवासामध्ये दिवसेंदिवस आंदोलनाला प्रतिसाद मिळत असल्याच्या प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केल्या.  

प्रत्येक गावातील मराठा समाजातील तरुण आंदोलनात सहभागी झाले आहेत. आम्ही स्वखर्चाने गाडी करून आलो असून, आरक्षण मिळेपर्यंत लढ्यात सहभाग कायम असेल. - गणेश पाचकोट, परभणी

शेतात काही पिकत नाही. मुलांना शिकविण्यासाठी पैसे नाहीत. शिकलेल्या मुलांना नोकरी नाही. यामुळे आरक्षण मिळेपर्यंत आता माघार घ्यायची नाही. - माधव कदम, बोर्डा, गंगाखेड, परभणी

मराठा आरक्षणासाठीच्या आतापर्यंतच्या सर्व लढ्यात सहभागी होत आलो आहे. लढा आता निर्णायक टप्प्यात आला असून, आता आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही.     - सोपान क्षीरसागर, जालना

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील