शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बनावट कॉलसेंटरवर छापा, आठ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 06:22 IST

कर्ज अथवा विमा काढून देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉलसेंटरवर गेल्या आठवड्यात कारवाई केली.

नवी मुंबई : कर्ज अथवा विमा काढून देण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करण्यासाठी चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉलसेंटरवर गेल्या आठवड्यात कारवाई केली. सीबीडीच्या पोलीस आयुक्तालयात शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी ही माहिती दिली.कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची तक्रार सायबर सेलकडे प्राप्त झाली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त अजय कदम, सायबर शाखेचे वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात करण्यात आली होती. तक्रारदारांना आलेले फोन ड्रिम मॉलमधील एका सर्व्हिस सेंटरमधून आल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार गत आठवड्यात पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला होता. या वेळी तिथे चालणारे बनावट कॉलसेंटर उघड झाले. ड्रिम मॉलमधील भाड्याच्या गाळ्यामध्ये अल्ट्रा मॅनेजमेंट सर्व्हिसेसच्या नावाखाली कार्यालय सुरू करण्यात आले होते. त्या ठिकाणावरून गरजवंतांना फोन करून कर्ज अथवा विमा काढून देण्याचे आश्वासन दिले जायचे. याकरिता बजाज अलायन्स, रिलायन्स सर्व्हिसेस व इतर कंपन्यांच्या नावाचा वापर केला जायचा. याकरिता सदर कंपन्यांच्या नावाशी साम्य असलेली बनावट बँक खातीही उघडण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या खोट्या आश्वासनाला कोणी बळी पडल्यास त्यांना कर्ज अथवा विमा काढून देण्यासाठी लागणारे शुल्क दिल्ली, नोयडा अथवा गाझियाबाद येथील बँक खात्यात भरण्यास सांगितले जायचे.अटक केलेल्यांची रोहित पार्टे (२९), प्रशांत कोटीयन (२८), नीलेश पडवळे (३१), प्रवीण निंबाळकर (२८), राहुल वैराळ (२६), विक्रांत गजमल (२९), परेश दीपकर (३४) व सुमित सावंत (२४) अशी नावे आहेत. त्यांच्या कार्यालयातून तीन लॅपटॉप, २० मोबाइल फोन व एक संगणक व तीस हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.>झटपट श्रीमंतीसाठी भांडुपला उघडले सेंटरअटक केलेले आठही जण यापूर्वी विक्रोळी येथील एका कंपनीत एकत्र कामाला होते. तेथील ग्राहकांची माहिती त्यांच्याकडे होती. या आधारे तसेच झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी एकत्रित येऊन भांडुपला बनावट कॉलसेंटर सुरू केले होते. त्यांनी राज्यभरात अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता असून, त्यापैकी दोन घटना खारघर व उरणमधील आहेत. त्यांची एकूण साडेपाच लाखांची फसवणूक झालेली आहे.