शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
4
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
5
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
6
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
7
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
8
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
9
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
10
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
11
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
12
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
13
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
14
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
15
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
16
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
17
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
18
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
19
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
20
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना

सरकारी रुग्णालयांत सुविधांची वानवा

By admin | Updated: April 20, 2016 02:30 IST

खालापूर तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिका, अपुरे मनुष्यबळ, डॉक्टरांची रिक्त पदे तसेच पुरेशा साधनसामुग्रीचा अभाव असल्याने सरकारी रुग्णालये

खोपोली : खालापूर तालुक्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिका, अपुरे मनुष्यबळ, डॉक्टरांची रिक्त पदे तसेच पुरेशा साधनसामुग्रीचा अभाव असल्याने सरकारी रुग्णालये गैरसोईची ठरत आहेत. तालुक्यातील चारही सरकारी रुग्णालयांमध्ये एकही भूलतज्ज्ञ नाही. त्यामुळे रुग्णांवर शस्त्रक्रिया करताना अडचणी येत असल्याचे परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. गोरगरीब जनता तसेच आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी बांधव या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र सुविधांअभावी गैरसोय होत आहे. आरोग्य विभागाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. तालुक्यातील वावोशी, लोहोप व बोरगाव येथे तालुका प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात एक डॉक्टर, दोन परिचारिका, एक शिपाई व एका सफाई कामगाराची कमतरता आहे. चौकमध्येही अशीच स्थिती असून, वैद्यकीय अधिकाऱ्यांसहित ३० जणांची गरज असताना २२ कर्मचारी कार्यतर आहेत. यात १ डॉक्टर, ४ सफाई कामगार ,१ केमिस्टचे पदे भरणे गरजेचे आहे. बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) दररोज १३० ते १५० रुग्ण येतात. महिन्याला ११० ते १२० जणांवर शस्त्रक्रि या होते. नियमित उपचारांसाठी १४० ते १४५ रुग्ण येतात. जवळच महामार्ग असल्याने अपघात, संशयास्पद मृत्यू असे ७ ते ८ रुग्ण दाखल होतात.