शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिंद्रे खटल्याच्या निकालासाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 02:13 IST

कामकाजासाठी एक वर्ष; आनंद बिंद्रे यांची साक्ष पूर्ण; आरोपींच्या अडचणी वाढल्या

पनवेल : सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील आरोपी राजेश पाटीलने जामीन मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला जाण्याच्या भीतीने अचानक काढून घेतला आहे. त्यामुळे या हत्येच्या खटल्यातील आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या खटल्याचे कामकाज पूर्ण करण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाने पनवेल सत्र न्यायालयाला दिली आहे.

अश्विनी बिंद्रे हत्याकांडामध्ये बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर हे आरोपी आहेत. या खटल्यातील साक्षीदारांची ओळख परेड आणि उलट तपासणी पनवेल सत्र न्यायालयाने गेल्या वर्षी सुरू केली होती. मुख्य साक्षीदार अश्विनी यांचे भाऊ आनंद बिंद्रे यांची साक्ष पूर्ण झाली असून, पती राजू गोरे यांची उलट तपासणी सुरू आहे. या खटल्याचे कामकाज आॅक्टोबरपर्यंत संपविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र कोरोनामुळे पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजीखटल्यातील प्रमुख आरोपी राजेश पाटीलने जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे, ही माहिती सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीप घरत यांना देण्यात आली नाही. २७ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजता याबाबत त्यांना कळविण्यात आले. यावरून पोलीस यंत्रणा आजही अभय कुरूंदकर आणि अन्य आरोपींना वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी करून पोलिसांच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र