शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

पनवेलमध्ये २१ लाखांची वीजचोरी उघड

By admin | Updated: November 1, 2015 00:18 IST

पनवेल तालुक्यामधील वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. तळोजासह नऊ गावांमध्ये धाड टाकून वीजचोरीच्या २७८ घटना उघडकीस

नवी मुंबई : पनवेल तालुक्यामधील वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. तळोजासह नऊ गावांमध्ये धाड टाकून वीजचोरीच्या २७८ घटना उघडकीस आणल्या आहेत. २१ लाख रुपयांची वीज चोरून वापरली असल्याचे निदर्शनास आले असून, संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. विजेची गळती आटोक्यात आणण्यासाठी आणि वीज देयकाची वसुली वाढविण्याकरीता महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाने वीजचोरीविरोधातील ही मोहीम सुरू केली आहे. पनवेल परिसरामध्ये विजेची गळती मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. या परिसरात वीजचोरी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी वीजवाहिन्यांवरील वीजगळती कमी करण्यासाठी खास पथक तयार केले आहे. वीजचोरी निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश या पथकाला दिले आहेत. पनवेल एक उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष राठोड यांनी १६, १९ आणि २० आॅक्टोंबरला तळोजा, नावडा, देवीचा पाडा, चिंचवली, शिरवली भोदर, उत्तरपाडासह एकूण नऊ गावांमध्ये धाडी टाकल्या. या परिसरात २७८ जणांनी वीजचोरी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांनी तब्बल १ लाख ५५ हजार ५८१ युनिट चोरून वापरले असून, त्याची किंमत २१ लाख रुपये होत आहे. या परिसरात झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. वीज कायदा २००३ च्या अधीन राहून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरी केलेल्या युनिटची व दंडाच्या रकमेची वीजदेयके वितरीत करण्यात आली आहेत. आतापर्यंत १८ ग्राहकांनी ३ लाख रुपयांची रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. वीजदेयके नाकारणाऱ्या ४० ग्राहकांवरही वीज कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. वीजचोरी करणे हा दंडनीय अपराध आहे. या गुन्ह्यांत संबंधितांना कारावासाचीही शिक्षा होऊ शकते. वीजचोरीमुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नाही. भारनियमन मुक्तीच्या वाटेतील हा मोठा अडसर असल्याचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी सांगितले आहे. वीजचोरी करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)महावितरणने मागेल त्याला रीतसर वीजपुरवठा देण्याचे धोरण आखले आहे. नागरिकांनी रीतसर वीजजोडणी घ्यावी. कोणीही वीजचोरी केली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. वीजचोरीविरोधातील मोहीम सुरूच राहणार असल्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.