शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

उरणच्या मोरा बंदराचा वनवास संपणार, जेट्टीच्या मजबुतीकरणासाठी १९.२२ कोटींचा निधी

By नारायण जाधव | Updated: October 11, 2023 17:36 IST

मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान ९ किलोमीटरचा जलमार्ग आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई ते मुंबईसह अलिबाग जलप्रवासासाठी महत्त्वाचे बंदर म्हणून उरण नजीकचे मोरा बंदर ओळखले जाते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून येथील जेट्टीची दुरवस्था झाली आहे. यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन गृह विभागाने उशिराने का हाईना या जेट्टीचे मजबुतीकरण आणि इतर कामांसाठी ११ ऑक्टोबर २०२३ रोजी १९ कोटी २२ लाख ६५ हजार ८७ रुपयांचा भरीव निधी मंजूर केला आहे. यामुळे या जेट्टीचा वनवास लवकरच संपणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोरा बंदर ते मुंबईतील भाऊचा धक्का दरम्यान ९ किलोमीटरचा जलमार्ग आहे. या जलमार्गावरून प्रवास करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने मोरा जेट्टी बांधली आहे. मात्र, सध्या तिची दुरवस्था झाली असून समुद्रात असलेल्या या जेट्टीच्या मार्गावरील ये-जा करण्यासाठी असलेले संरक्षक लोखंडी पाइप, असलेले कठडे तुटलेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे बंदरावर जात असताना येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता आहे. शिवाय रात्रीच्या वेळी जेट्टीवरील विजेची सोय विस्कळीत असल्याने बहुतांश वेळा दिव्याखाली अंधार असतो.

बांधकामासाठी सीआरझेडची परवानगी लागणारया जेट्टीवर मासळी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे दुरुस्तीचे कामदेखील सुरू असल्याने त्याचा नाहक त्रास प्रवाशांना होतो. तसेच बंदर विभागाने या ठिकाणी वाहनांना बंदी घातली असूनदेखील जेट्टीवरच दुचाकी उभ्या केल्या जात असल्याने हे बंदर अनेक असुविधांनी ग्रासलेले आहे. यामुळे तिच्या दुरुस्तीची मागणी प्रवाशांसह मच्छीमारांकडून होत होती. अखेर शासनाने ही मागणी लक्षात घेऊन हा निधी मंजूर केला आहे. आता सीआरझेडची परवानगी घेऊन आणि शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करून जेट्टीचे मजबुतीकरण करावे लागणार आहे.

१९३४ साली बांधली जेट्टीमोराची प्रवासी जेट्टी ही साधारणपणे १९३४ मध्ये बांधलेली आहे. मात्र, गेल्या ८९ वर्षांत देखभाल दुरुस्ती अभावी आणि समुद्राच्या खाऱ्या वार्यामुळे तिची दुरवस्था झाली आहे. या जेट्टीची लांबी ४५ मीटर आणि रुंदी ५ मीटर इतकी आहे. तिचा वापर प्रवासी आणि मच्छीमार करतात. या बंदरातून मुंबई ते मोरा दरम्यान दिवसाला एक ते दीड हजार प्रवासी प्रवास करतात.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई