शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive Video: रसायनी वायुगळतीत बळी गेलेल्या पशु-पक्ष्यांची अधिकाऱ्यांकडून विल्हेवाट, प्रत्यक्षदर्शीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 13:06 IST

रसायनीतल्या पाताळगंगामध्ये असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून झालेल्या वायुगळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अजय परचुरे/भालचंद्र जुमलेदारपनवेल- रसायनीतल्या पाताळगंगामध्ये असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून झालेल्या वायुगळतीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वायुगळतीमुळे 28 वानरांसह 48 माकडं मृत्युमुखी पडली. त्याचा कोणालाही थांगपत्ता न लागू देता अधिकाऱ्यांना विल्हेवाट लावली आहे.अधिकारी विल्हेवाट लावत असताना एका प्रत्यक्षदर्शीनं पाहिलं आहे. त्या प्रत्यक्षदर्शीनं लोकमतला पशु-पक्ष्यांची कशा पद्धतीनं विल्हेवाट लावली याची माहिती दिली आहे. पशु-पक्ष्यांना पुरण्यासाठी जेसीबीनं खड्डा खणण्यात आला, त्यावेळी मारुती खुराडे ही व्यक्तीही तिथे उपस्थित होती. एकाच खड्ड्यात मोठमोठ्या वानरांसह माकड आणि कबुतरांना गाडण्यात आलं. ते दृश्य पाहून मला रात्रीच जेवणही गेलं नाही. तेव्हा फोटो काढावा असं वाटलं होतं. परंतु माझ्याकडे कॅमेरावाला फोन नव्हता. त्यामुळे फोटो काढता आला नाही, असंही प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं आहे.

28 वानरांसह 48 मृत्युमुखी पडलेल्या माकडांचा एचओसी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणालाही थांगपत्ता न लागू देता विल्हेवाट लावली आहे. या घटनेनं प्राणी मित्रांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तसेच रसायनीच्या जवळपास कर्नाळा अभयारण्य असल्यानं या वायुगळतीमुळे वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण झाला आहे.  रसायनी इथल्या पाताळगंगा परिसरात असलेल्या हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल कंपनीतून मोठ्या प्रमाणात वायुगळती झाली. बुधवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास ही घडना घडली असून, या वायुगळतीमुळे 28 वानरांसह 48 माकडं मृत्युमुखी पडली आहेत. तर 100हून अधिक पक्षी गतप्राण झाले आहेत.हिंदुस्थान ऑर्गेनिक केमिकल(एचओसी) कंपनी ही इस्रोसाठी इंधन निर्मितीचं काम करते. 13 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी रात्री 9.45 वाजताच्या सुमारास या कंपनीच्या इंधनाच्या टाकीतून ही वायुगळती सुरू झाली. या वायुगळतीचा आजूबाजूच्या परिसरातील असंख्य पशू-पक्ष्यांना फटका बसला.

टॅग्स :panvelपनवेल