शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
3
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
4
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
5
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
6
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
7
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
8
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
9
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
10
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
11
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल
12
कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली? डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर
13
इस्रायल थांबला, पण आता तुर्की सुरू झाला... सिरियामध्ये हाहा:कार, दमास्कसनंतर अलेप्पो 'लक्ष्य'
14
सत्तेची मस्ती, नेत्यांची फ्री स्टाईल कुस्ती! महायुतीतील तिन्ही पक्षांनी जनतेला दाखवला 'लाथा-बुक्क्यांचा सिनेमा'
15
"कृषिमंत्री कोकाटेंचा खुलासा अयोग्यच, एक-दोन वेळा दादांनीही...!"; सुनील तटकरे स्पष्टच बोलले
16
ज्यूस प्यायला नाही म्हणून सांबारमध्ये विष; २ मुलांच्या आईला बॉयफ्रेंडने दिली भयंकर आयडिया अन्...
17
"अजून मारा पण कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या"; मारहाणीनंतर विजयकुमार घाडगे संतप्त; म्हणाले, 'तटकरेंना एक शब्द वाकडा बोललो असेल तर...'
18
IND vs ENG : टीम इंडियातील हा स्टार खेळाडू मालिकेतून 'आउट'; चौथ्या कसोटी आधी आली संघ बदलण्याची वेळ
19
मुंबई विमानतळावर मोठा अपघात टळला! विमान धावपट्टीवरून घसरले, तिन्ही टायर फुटल्याने खळबळ
20
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप

नापास विद्यार्थ्यांची सोमवारी परीक्षा

By admin | Updated: July 16, 2016 01:50 IST

महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू असतानाच १० वी व १२ वीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा कोकण विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जात आहे.

ठाणे : महाविद्यालयीन प्रवेशाची लगीनघाई सुरू असतानाच १० वी व १२ वीत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची परीक्षा कोकण विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जात आहे. यानुसार १२ वीतील आठ हजार ५१८ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत सुरू असून १० वीच्या ११ हजार १७१ विद्यार्थ्यांची परीक्षा सोमवार, १८ जुलैपासून घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी केंद्रास परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांची ही पुनर्परीक्षा २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. या साडेआठ हजार विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था १२ परीक्षा केंद्रांवर केली आहे. याशिवाय ३ आॅगस्टदरम्यान पार पडणाऱ्या १० वीच्या पुनर्परीक्षेला जिल्ह्यातील ११ हजार १७१ विद्यार्थी आहेत. त्यांची जिल्ह्यातील २८ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. परीक्षा केंद्रांत व आजूबाजूच्या परिसरांत शांतता व सुव्यवस्था राखण्यासह अनुचित प्रकारास आळा घालण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. परीक्षा काळामध्ये परिरक्षण केंद्र,परीक्षा केंद्र, उपकेंद्र व परिसरात काही असामाजिक तत्त्वे परीक्षा प्रक्रि येत गैरव्यवहार व बाधा निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीक्षा केंद्राच्या परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ, कम्युनिकेशन सेंटर या ठिकाणांहून गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे. याशिवाय बेकायदेशीर जमाव जमवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान अगर शांतताभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरील या अनुचित घटनांना वेळीच प्रतिबंध घालणे जरु रीचे आहे.