शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
3
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
4
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
5
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
6
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
7
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
8
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
9
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
10
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
11
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
12
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
13
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
14
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
15
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
16
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
17
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
18
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!

१२ वर्षे झाली तरी गटशिक्षणाधिकारी नाही

By admin | Updated: April 23, 2016 02:01 IST

तळा तालुका निर्मिती २६ जून १९९९ मध्ये झाली. त्यानंतर तळा पंचायत समिती निर्माण झाली. तोपर्यंत तळ्याचे सर्व कामकाज माणगांव पंचायत समितीमार्फत चालत होते.

तळा : तळा तालुका निर्मिती २६ जून १९९९ मध्ये झाली. त्यानंतर तळा पंचायत समिती निर्माण झाली. तोपर्यंत तळ्याचे सर्व कामकाज माणगांव पंचायत समितीमार्फत चालत होते. साधारणपणे माणगांव पंचायत समितीमधून तळा पंचायत समितीचा शिक्षण विभाग २००४ मध्ये स्वतंत्र झाला. तेव्हापासून तळा पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत तालुक्यातील शिक्षण विभागाचे कामकाज पाहिले जात आहे. २००४ ते २०१६ अशी तब्बल १२ वर्षे तळा पंचायत समिती शिक्षण विभागाला गटशिक्षण अधिकारी नाहीत. या अगोदर गटविकास अधिकारी हे काम पाहत असत. गटशिक्षण अधिकारी पद रिक्त असल्याने हे पद त्वरित भरून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.२ ते १३ आॅगस्ट २००६ या ११ दिवसांसाठी एस. जी. झंझणे यांची गटशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. ११ दिवसातच ताबडतोब त्यांची दापोली येथे बदली करण्यात आली. आणि आज जवळपास १२ वर्षे गटशिक्षणाधिकारी हे पद रिक्त आहे. तळा हा नव्याने निर्माण झालेला डोंगरी आणि दुर्गम तालुका आहे. या तालुक्यातील शाळांमधील शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी किंबहुना साक्षरतेचे प्रमाण वाढीसाठी यासह शासनाच्या विविध शैक्षणिक योजना तळागाळापर्यंत पोहोचविणेसाठी सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे.शासनाने गटशिक्षणाधिकारी हे पद प्रत्येक तालुका पातळीवर निर्माण केलेले आहे. परंतु त्या पदाची अंमलबजावणी होत नाही. मग या पदाचा चार्ज तत्सम अधिकारी किंवा विस्तार अधिकारी यांच्याकडे देवून वेळ मारून नेणे एवढेच काम करणे. आज अनेक ठिकाणी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. गटशिक्षणाधिकारी पद रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागात अनेक कामांची अडचण होते. तरी शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषदेने हे पद त्वरित भरून जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. (वार्ताहर)