शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

१.५ कोटी कस्टम ड्युटी बुडवून आयात केलेले ९५ लाख किमतीचे इथेनॉल शुल्क विभागाकडून जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 19:32 IST

५८ हजार लिटर्सचा साठा जप्त

मधुकर ठाकूर

उरण :  ड्युटी बुडवून आयात केलेले दीड कोटी किमतीचे इथेनॉल न्हावा -शेवा सीमा शुल्क विभागाकडून जप्त करण्यात आले आहे.मुंबई कस्टम झोन ३ च्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी कारवाई केली आहे.

सोलापूर येथील हेमंत ट्रेडिंग कंपनीने ५८ हजार लीटर  इथेनॉल प्रदेशातुन मागविण्यात आले होते. कंपनीने हे इथेनॉल रसायन प्रयोगशाळेच्या वापरासाठी असल्याचे चुकीचे घोषित करण्यात आले होते.या इथेनॉल रसायनावर सीमा शुल्क विभागाकडून १५० टक्के शुल्काची आकारणी करते.मात्र रासायनिक आणि फार्मास्युटिकल कंपन्या अल्कोहोल कच्चा माल म्हणून कमी शुल्कात आयात करू शकतात.मात्र कंपनीने आयात करण्यात आलेले इथेनॉल प्रयोगशाळेच्या वापरासाठी असल्याचे चुकीचे घोषित केले . तसेच सीमा शुल्क विभागाची दिशाभूल करीत फक्त १० टक्के शुल्क भरुन हे इथेनॉल न्हावा

-शेवा बंदर उतरवून घेतले.

 अशा संशयास्पद आयातीची मुंबई कस्टम झोन ३ च्या अधिकाऱ्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानंतर मंगळवारी कारवाई करीत दीड कोटी किमतीचे ५८ हजार लिटर्स इथेनॉल जप्त करण्यात आले.या हेमंत ट्रेडिंग कंपनीने याआधीही मागील पाच वर्षात अनेक वेळा फसवणूक करून सीमा शुल्क विभागाची दिशाभूल करीत कोट्यावधींची ड्युटी बुडवून इथेनॉल युकेतुन आयात केलेले असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.यासाठी कंपनीला नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत.मात्र त्याकडे कंपनीने कानाडोळाच केला आहे.मंगळवारी पकडलेल्या खेपाव्यतिरिक्त युकेमधुन कंपनीने ऑर्डर केलेले अल्कोहोलचे आणखी दोन कंटेनर आयात करण्यात येणार आहेत.हे दोन्ही कंटेनरही जप्त केले जाणार असल्याचे माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :uran-acउरण