शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लोणार पोलिसांच्या तावडीतून आरोपीचे पलायन, तुर्भे नाक्यावरील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 1, 2023 17:07 IST

बुलढाणाच्या लोणार पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे.

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी लोणार पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला आहे. मीरा भाईंदर येथून त्याला अटक केल्यानंतर बुलढाणाच्या लोणार येथे त्याला नेले जात असताना तुर्भे नाका येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी त्याच्यावर तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बुलढाणाच्या लोणार पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. सदर मुलीला फूस लावून पळवून आणून मीरा भाईंदर परिसरात ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून लोणार पोलिसठाण्याचे कर्मचारी व पीडित मुलीचे नातेवाईक मीरा भाईंदर परिसरात आले होते. त्याठिकाणी शोधमोहीम राबवली असता सोमवारी विशाल साळवे (२१) हा पोलिसांच्या हाती लागला. स्थानिक पोलिसांना त्याच्या अटकेची माहिती देऊन लोणार पोलिसांनी त्याचा ताबा घेतला होता. त्यानुसार सोमवारी रात्री त्याला खासगी गाडीतून लोणार पोलिस ठाण्यात नेले जात होते.

रात्री १० च्या सुमारास त्यांची गाडी तुर्भे नाका येथे आली असता, सर्वजण हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. यावेळी गाडी थांबताच संधी साधून विशाल याने पोलिसांना चकमा देऊन पळ काढला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून देखील तो मिळून आला नाही. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिस ठाण्यात विशाल साळवे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस