शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

हे परमेश्वरा आमच्या खारफुटींना वाचव! मंदिरासाठी सीआरझेड “उल्लंघनांवर” पर्यावरणवाद्यांचे साकडे

By नारायण जाधव | Updated: June 8, 2023 16:58 IST

पर्यावरणवाद्यांनी आपली कळकळ प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणा-यांपर्यंत पोहचवताना हे उद्गार काढले.

नवी मुंबई: “पर्यावरणाचे आता परमेश्वरच संरक्षण करेल”,  १० एकरांच्या भूखंडांचे बालाजी मंदिराला वाटप केल्यामुळे सीआरझेड उल्लंघनाबद्दल काळजी व्यक्त करत, पर्यावरणवाद्यांनी आपली कळकळ प्रकरणाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणा-यांपर्यंत पोहचवताना हे उद्गार काढले.

 “अगदी मागच्या ऑगस्टमध्ये जेव्हा मंदिराच्या पाया उभारणीचे नियोजन करण्यात आले, तेव्हापासून आम्ही हा भूभाग मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या कास्टिंग यार्डासाठी दिलेल्या जमीनीचा भाग असल्याचे जीव तोडून सांगत आहोत. कास्टिंग यार्डसाठी दिलेली जागा खारफुटी आणि आंतरभरती पाणथळ क्षेत्रे तसेच स्पष्टपणे दिसून येत असलेल्या सीआरझेड१ क्षेत्रांचा भाग आहे,” असे नॅटकनेक्टचे संचालक बी एन कुमार म्हणाले.

प्रधानमंत्र्यांनी ७५ किनारपट्टीय प्रदेशांना आंतर्भूत करणा-या आपल्या आवडत्या मिष्टी- मॅगग्रुव्ह इनिशिएटिव्ह फॉर शोअरलाइन हॅबिटाट्स ऍंड टॅंजिबल इन्कम्स उपक्रमाचा परिचय करुन देण्याच्या ४८ तासांच्या आत या खारफुटी क्षेत्रावर भूमीपूजन सोहळा संपन्न झाला ही अतिशय दु:खद बाब आहे, असे कुमार म्हणाले.

“बंगाली भाषेमध्ये मिष्टी या शब्दाचा अर्थ ’गोड’ असा होतो. परंतु पर्यावरणासाठी किंवा खारफुटी तसेच पाणथळ क्षेत्रांवर गुजराण  करणा-या स्थानिक मच्छिमार समुदायासाठी ही बाब अजिबात सुखावह नाही”, हे त्यांनी केंद्राला दिलेल्या त्यांच्या नवीन संदेशात सांगितले.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने जुहू बीचवर वर्सोवा-बांद्रा लिंकसाठी कास्टिंग यार्डला नकार दिल्याची कार्यकर्त्यांनी ही देखील आठवण करुन दिली.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (एमओइएफसीसी) मंत्रालयाने नॅटकनेक्टच्या तक्रारीला प्रतिसाद देत, महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाला तक्रारींचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: किमान चार वेळा तक्रारींच्या शृंखलांना प्रतिसाद दिला आणि पर्यावरण विभागाचे मुख्य सचिव प्रवीण दराडे यांना  तक्रारींकडे लक्ष देण्याची सूचना दिली होती.सीआरझेडने घाईत मंजुरी दिल्याचा आरोप

तरी सुध्दा २३ मे रोजी झालेल्या एमसीझेडएमए बैठकीमध्ये सीआरझेडने घाईघाईमध्ये मंदिर प्रकल्पाला होकार दिला, हे कुमार यांनी निदर्शनास आणून दिले. एकच मुद्द्यावर घेतल्या जाणा-या या बैठकीची (क्र.१६७)सूचना त्याच दिवशी देण्यात आली आणि “आमच्या माहितीनुसार पर्यावरणाबद्दल काळजी असलेल्या काही महत्वपूर्ण लोकांनी बैठकीला उपस्थित राहणे टाळले,” असे कुमार म्हणाले.

आम्ही हे पुन्हा स्पष्ट करत आहोत की, आम्हाला मंदिराबद्दल कोणताही आक्षेप नाही, परंतु पुराणांमध्ये सांगितल्याप्रमाणे पर्यावरणाचा देखील आदर केला पाहिजे, तिरुपतीच्या घोषवाक्यांमध्ये देखील याचा उल्लेख आढळतो, असे कुमार म्हणाले.

नॅटकनेक्टला दुजोरा देताना श्री एकवीरा आई प्रतिष्ठानच्या नंदकुमार पवार यांनी मंदिरासाठी देण्यात आलेला भूभाग आणि कास्टिंग यार्डामुळे देखील मानवी अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचे सांगितले.

स्थानिक मच्छिमार समुदाय या भागामधून खाडीत प्रवेश करत असे, पण कास्डिंग यार्डमुळे खारफुटी व पाणथळ क्षेत्रांवर भराव घातला गेला, अशी माहिती पवार यांनी दिली.

प्रवेशास मनाई केलेल्या समुदायांना एमटीएचएल कार्याची पूर्तता झाल्यानंतर आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. पण आता या क्षेत्रात मच्छिमारी करता येणार नाही हे समजल्याने त्यांना मोठा धक्का बसला असल्याचे पवारांनी सांगितले.मच्छीमारांचे नुकसान

मंदिरा व्यक्तिरिक्त अपरिहार्यपणे उभारल्या जाणार असलेल्या इतर लॉजिस्टिक्स आणि संरचनेमुळे मच्छिमार समुदायाला संपूर्ण किनारपट्टी हाताळणे अश्यक्य होणार असल्याचे पवार म्हणाले.

कास्टिंग यार्डमधून सर्व भराव काढून टाकला जाऊन आंतरभरती प्रवाह पुन्हा खेळता केला पाहिजे. ज्यामुळे खारफुटींना पुनरुज्जीवन मिळेल. खारफुटी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय आपोआप वाढतात ही बाब उरण सारख्या काही उधवस्त परिसरांमध्ये सिध्द झाली असल्याचे कुमार व पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईfishermanमच्छीमार