शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी ठेकेदाराकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:06 IST

बाह्ययंत्रणेद्वारे नोकरभरती; पनवेल महापालिकेचे नवे परिपत्रक

- वैभव गायकर पनवेल : पनवेल महापालिकेने बोगस भरतीवर लगाम लावण्यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी, तसेच संगणकीय चाचणी घेण्यासाठी २९ जानेवारी रोजी परिपत्रक काढले होते. या परिपत्रकात नमूद केलेल्या तारखेपर्यंत संबंधित कंत्राटी कामगारांनी आपले चारित्र्य पडताळणी अहवाल व संगणकावरील टंकलेखन स्पीड, तसेच वाहन चालविण्याची क्षमता आदींचा यामध्ये समावेश होता. मात्र, तारीख उलटून गेल्यानंतर पालिकेने दुसरे परिपत्रक काढून संबंधित कंत्राटदाराला प्रक्रि या पार पाडण्याचे आदेश नव्या परिपत्रकात दिले आहेत.पालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढलेल्या परिपत्रकात २८ फेब्रुवारीपर्यंत पालिकेतील सर्व कंत्राटी कामगारांनी चारित्र्य पडताळणी दाखले सादर करण्याचे आदेश दिले होते. तसेच या कंत्राटी कामगारांमधील वाहन चालक, डेटाएंट्री आॅपरेटर्स यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत संगणकावरील टंकलेखनाची स्पीड टेस्ट तसेच वाहन चालकांची वाहन चालविण्याची क्षमतेची चाचणी पालिकेच्या मार्फत घेतली जाणार होती. बोगस भरतीवर आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले होते. मात्र, पालिकेने स्वत:ची भूमिका बदलत नव्याने परिपत्रक काढत पालिकेत कंत्राटी कामगार पुरविणाºया मे. गुरु जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला नव्याने कर्मचाऱ्यांचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.पनवेल महानगर पालिकेत बाह्ययंत्रणेद्वारे सध्याच्या घडीला २२५ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये शिपाई, डाटा एंट्री आॅपरेटर्स, वाहन चालक, फायरमन आदींसह बहुउद्देशीय कर्मचाºयांचा यामध्ये समावेश आहे. पालिकेने ही जबाबदारी कर्मचारी पुरविणाºया कंत्राटदारावर दिल्याने ही प्रक्रि या कितपत पारदर्शक असेल अशी शंका निर्माण झाली आहे.पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायत कर्मचाºयांची पडताळणी नाहीपनवेल महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ ग्रामपंचायतींमधील ३२० कर्मचाºयांचा नुकतेच पालिकेत समावेश करण्याचा निर्णय कोकण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने घेतला आहे. मात्र, दोन वर्षे उलटून पालिकेची सेवा बजावत असलेल्या या कर्मचाºयांची चारित्र्य पडताळणी पालिकेने केलेली नाही.चारित्र्य पडताळणी तसेच इतर चाचण्यांसाठी पालिकेने यापूर्वी काढलेले परिपत्रक कर्मचाºयांसाठी होते. नव्याने काढलेले परिपत्रक हे कंत्राटदारासाठी आहे.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त, पनवेल महानगर पालिकाकर्मचारी भरतीपूर्वी पडताळणी का नाही ?पालिकेत नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांमार्फत महासभेत करण्यात आली आहे. मात्र, तरी देखील कंत्राटदारामार्फत पालिका क्षेत्राबाहेरील भरती केली आहे. भरती करण्यापूर्वीच कर्मचाºयांकडून चारित्र्य पडताळणी का करून घेतल्या जात नाही, हा प्रश्न देखील उपस्थित राहिला आहे .

टॅग्स :panvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिका