शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांचा एल्गार, सोमवारी एपीएमसी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 06:06 IST

Mathadi workers News : सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी १४ डिसेंबरला एक दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न १५ वर्षांपासून प्रलंबित आहेत. सरकार काेणाचेही असो कामगारांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी माथाडी कामगारांनी १४ डिसेंबरला एक दिवस बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकारविरोधात निकराची लढाई सुरू करण्यात येणार आहे. आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी माथाडी भवनमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी, कामगारांना एकजुटीने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. राजकीय पक्ष न पाहता कामगारांच्या हितासाठी नेहमीच आंदोलने केली आहेत. मागील १५ वर्षांत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. माथाडी बोर्डावर व सल्लागार समितीवर सदस्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. कामगार क्षेत्रात गुंडगिरी करणाऱ्या टोळ्यांचा शिरकाव झाला आहे. संघटनांच्या नावाखाली खंडण्या वसूल केल्या जात आहेत. व्यवसायामध्ये परदेशी गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यापासून कामगारांचे अस्तित्वही नष्ट होत चालले आहे. कामगारांचे सर्व प्रश्न शासनाने तत्काळ सोडवावेत यासाठी निकराची लढाई सुरू केली जात आहे. १४ डिसेंबरला होणाऱ्या आंदोलनात सर्व कामगारांनी ताकदीने उतरावे, असे आवाहनही पाटील यांनी या वेळी केले.माथाडी कामगार चळवळीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अस्तित्व टिकविण्यासाठी ही लढाई आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कायद्यांमुळे बाजार समिती, तेथील व्यापारी व कामगार सर्वांचेच अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचेही आमदार शशिकांत शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील, दिलीप खोंड, पोपटराव देशमुख, गुंगा पाटील, भारती पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभर होणार आंदोलनमाथाडी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा व इतर ठिकाणचे माथाडी कामगारही सहभागी होणार आहेत. मार्केट बंद करून माथाडींच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीMaharashtraमहाराष्ट्र