शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
5
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
6
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
7
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
8
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
9
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
10
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
11
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
12
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
13
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
14
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
15
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
16
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
17
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
18
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
19
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
20
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा

उलवेवासीयांचा सिडकोविरोधात एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 3:51 AM

ही दहशत मोडीत काढण्यासाठी सिडकोने परिसरातील अनधिकृत टपºया, गॅरेज, आठवडे बाजार यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी.

नवी मुंबई : सिडको विरोधात उलवेतील व्यावसायिकांनी सोमवारपासून बेमुदत आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात प्रकल्पग्रस्त महिलांसह रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सिडकोचे अधिकारी परप्रांतीय अनधिकृत फेरीवाल्यांना पाठीशी घालून इतर व्यावसायिकांवर कारवाया करून दुजाभाव करत असल्याचा उलवेवासीयांचा आरोप आहे.नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळामुळे महत्त्व प्राप्त झालेल्या उलवे परिसराचा अद्यापही अपेक्षित असा विकास सिडकोने केलेला नाही. सद्य:स्थितीला तिथल्या रहिवाशांना चांगले रस्ते, उद्यान, मैदाने यापासून वंचित राहावे लागत आहे. अशातच वाढत्या अनधिकृत फेरीवाल्यांनी अर्थपूर्ण राजकीय वरदहस्त मिळवून सुविधांचे भूखंड बळकवायला सुरुवात केली आहे. मात्र, यासंदर्भात अनेकदा तक्रार करूनही परिसरातील आठवडे बाजार बंद झालेले नाहीत. यामागे फेरीवाल्यांकडून सिडको अधिकाऱ्यांना होणारा लक्ष्मीस्पर्श कारणीभूत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. हे हितसंबंध जोपासत सिडकोचे अधिकारी अनधिकृत फेरीवाल्यांना पाठीशी घालून स्थानिक सामान्य व्यावसायिकांना त्रास देत असल्याचाही आरोप होत आहे. सोमवारी २३ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. दूध व्यावसायिका वंदना पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.परप्रांतीय फेरीवाल्यांची दहशतप्रकल्पग्रस्त वंदना पाटील यांच्या दुधाच्या व्यवसायावर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी कारवाई केली. मात्र, त्याच वेळी परिसरातल्या अनधिकृत टपºया, गॅरेज यांच्यावर कारवाई न करता पथक निघून गेले. यावरून ठरावीक व्यावसायिकांचा नफा करून देण्यासाठी आपल्यावर कारवाई झाल्याचा पाटील यांचा आरोप आहे.या प्रकारामुळे शहराबाहेरून येणाºया परप्रांतीय अनधिकृत फेरीवाल्यांना प्रोत्साहन मिळत असून, त्यांची गुंडगिरी वाढत चालली आहे. चार दिवसांपूर्वी डॉ. आरती धुमाळ यांनी आठवडे बाजाराची तक्रार केल्यामुळे फेरीवाला माफियांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. अशा प्रकारांवरून रहिवाशांमध्ये फेरीवाल्यांची दहशत निर्माण झाली आहे.ही दहशत मोडीत काढण्यासाठी सिडकोने परिसरातील अनधिकृत टपºया, गॅरेज, आठवडे बाजार यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी. तसेच फेरीवाल्यांसाठी अधिकृत जागा उपलब्ध करून त्यामध्ये स्थानिक, प्रकल्पग्रस्त व्यावसायिकांना प्राधान्य द्यावे, अशीही नागरिकांची मागणी आहे. त्याकरिता धरणे आंदोलन होत असून, परिसरातील अनधिकृत टपºया, गॅरेज हटेपर्यंत ते सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :cidcoसिडको